धारूर (बीड ) : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील गैरसोयीच्या विरोधात येथील विद्यार्थ्यांनी आज सकाळी १० वाजता तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.
शहरात टोलेजंग इमारतीमध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहे. मात्र सातत्याने शिक्षकांची गैरहजरी, स्वच्छता, पाणीपुरवठा अशा सोयी सुविधांचा येथे अभाव आहे. यावर विद्यार्थ्यांनी वारंवार निवेदने देऊनही काही सुधारणा झाल्या नाहीत. यामुळे आज सकाळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषेदेतर्फे विद्यार्थांनी तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. जवळपास ४० विद्यार्थी यात सामील होते. यावेळी रमेशराव आडसकर यांनी मध्यस्ती करत तहसीलदार सुनिल पवार यांनी संस्थेच्या प्राचार्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.