- अविनाश कदम आष्टी (बीड) : तालुक्यातील पिंपळगाव दाणी येथे जोरदार पावसामुळे रस्ता आणि पूल वाहून गेल्याने विद्यार्थी, नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहेत. या मार्गावरील रस्ता आणि पूल करण्यासाठी विद्यार्थी आणि ग्रामस्थ महिलांनी येथील तहसील कार्यालयासमोर आज दुपारपासून उपोषण सुरु केले आहे.
मेहकरी धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर पाणी नदी मोठ्या प्रमाणात प्रवाहित झाल्यानें हा पूल वाहून गेला आहे. दुसरा रस्ता नसल्याने तालुक्यातील पिंपळगाव दाणी गावातील ५० मुले शाळेपासून वंचित राहत आहेत. तसेच गावचा तालुक्याशी असलेल्या संपर्क तुटलेला आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण उत्सवी ७५ व्या वर्षात गावाला रस्त्याची भेट द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यासाठी भर उन्हात तहसील कार्यालयासमोर विद्यार्थी, महिला ग्रामस्थ उपोषणास बसले आहेत.