राज्याचे फलोत्पादन व रोहयो मंत्री संदिपान भुमरे हे २८ ऑगस्ट रोजी बीड जिल्हा दौऱ्यावर असताना शिवसैनिकांची बैठक घेतली होती. यावेळी हनुमंत जगताप यांनी राजकीय वादातून आपल्या भावावर व दोन पुतण्यांवर दोन गुन्हे दाखल असून, त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई केली आहे. हे अन्यायकारक असून, यासंदर्भात शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांकडून मदत होत नाही, असा सूर आवळत जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यावर आरोप केले होते. दरम्यान, २९ ऑगस्ट रोजी दुचाकीवरून सदाशिव सानप व गणेश जगताप हे बीडकडे येत असताना त्यांच्यावर पाच-सहाजणांनी हल्ला केला होता. यात ते गंभीर जखमी झाल्याने जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मंगळवारी पिंपळनेर पोलीस जबाब घेण्यासाठी गेले, परंतु त्यांनी जबाब दिला नाही. उपचारानंतर आपण जबाब देणार असल्याचे जगताप यांनी सांगितल्याचे सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब आघाव यांनी सांगितले.
उपजिल्हा प्रमुखास मारहाण; जबाब देण्यास असमर्थता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2021 5:11 AM