शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
5
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
6
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
7
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
8
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
9
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
10
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
11
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
12
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
13
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
14
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
15
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
16
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
17
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
18
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
19
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
20
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?

लग्नास नकार दिल्याने सोनवळा येथे अल्पवयीन मुलीस पेटविले, सर्व आरोपी फरार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2017 2:13 PM

लग्नास नकार दिल्याच्या रागातून तरुणाने तिघांच्या मदतीने अल्पवयीन मुलीला घरात घुसून पेटवून दिल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील सोनवळा येथे घडल्याचे उघडकीस आले आहे.

ठळक मुद्दे लग्नास नकार दिल्याच्या रागातून तरुणाने तिघांच्या मदतीने अल्पवयीन मुलीला घरात घुसून पेटवून दिले या घटनेत सदरील युवती गंभीर भाजली असून तिच्यावर स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अंबाजोगाई (बीड) : लग्नास नकार दिल्याच्या रागातून तरुणाने तिघांच्या मदतीने अल्पवयीन मुलीला घरात घुसून पेटवून दिल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील सोनवळा येथे घडल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेत सदरील युवती गंभीर भाजली असून तिच्यावर स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्रज्ञा ऊर्फे सोनाली सतिश मस्के (वय १७, रा. सोनवळा) असे या पिडीत युवतीचे नाव आहे. ती सध्या लोखंडी सावरगाव येथील महाविद्यालयात ११ वीच्या वर्गात शिकत आहे. तिने जबाबात सांगितल्यानुसार,  तिचे आई वडील सध्या कुंद्री येथील साखर कारखान्यावर ऊस तोडणीसाठी गेले आहेत. त्यामुळे ती सध्या आजी आणि दोन भावांसह सोनवळा येथेच स्वतःच्या घरी राहते. मागील आठवड्यात गावातीलच महादेव जालिंदर घाडगे या तरुणाने प्रज्ञाला लग्नासाठी मागणी घातली होती, परंतु तिने त्यास नकार दिला होता. 

मंगळवार (दि. २६) तिची आजी लाईट बिल भरण्यासाठी अंबाजोगाई येथे गेली होती. एक भाऊ शाळेत आणि एक भाऊ चुलत्याकडे गेलेला असल्याने ती घरी एकटीच होती. दुपारी ४ वाजताच्या सुमारास बबन नरहरी मस्के, कविता जालिंदर घाडगे, महादेव जालिंदर घाडगे आणि सुवर्णा बबन मस्के हे चौघेजण तिच्या घरी आले. यावेळी महादेव ने प्रज्ञास माझ्याशी लग्न करणार आहेस का असे विचारले. यावर प्रज्ञाने माझे वडील आणि चुलते यासाठी नाहीच म्हणणार आहेत आणि मी देखील तुझ्यासोबत लग्न करणार नाही असे सांगितले. 

यावर बबन व कविता या दोघांनी घरात घुसून प्रज्ञाचे दोन्ही हात पकडले व महादेव ने जवळच ठेवलेला डब्ब्यामधील रॉकेल  तिच्या अंगावर ओतले. तर सुवर्णा हिने काडी ओढून प्रज्ञाला पेटवून दिले. यानंतर चौघेही आरोपी तिथून पळून गेले. जीवाच्या आकांताने प्रज्ञाने आरडाओरडा केली. तिचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक धावत पळत आले आणि त्यांनी प्रज्ञाला अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल केले.या घटनेत प्रज्ञा ६१ टक्के भाजली असून तिची प्रकृती गंभीर आहे.

काल गुरुवारी तिचा पोलीस उपअधीक्षक यांच्यासमोर फौजदार देवकन्या मैंदाड यांनी तिचा इन कॅमेरा जबाब नोंदविला. याप्रकरणी प्रज्ञाच्या जबाबावरून आरोपी बबन नरहरी मस्के, कविता जालिंदर घाडगे, महादेव जालिंदर घाडगे आणि सुवर्णा बबन मस्के या चौघांवर कलम ३०७, ३४ अन्वये धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून सर्व आरोपी फरार आहेत. फौजदार घोळे हे पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :fireआगWomenमहिलाBeedबीडAmbajogaiअंबाजोगाई