माजलगाव : आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मागण्यांची दखल घेत नित्रुड परिसरातील विजेचा प्रश्न मार्गी लावला असून त्यादृष्टीने काम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
वीज वितरण कंपनीने उच्च दाबाने विजेचा पुरवठा करावा, नित्रूड फिडरवर आठ तास थ्री फेज लाईट सलग देण्यात यावी, नित्रूड गावातील पाणंद डी.पी.वरील सिंगल फेज २५ चे दोन रोहित्र चांगल्या प्रतीचे तात्काळ बसवण्यात यावे, नित्रूड गावातील सर्व सिंगल फेज व शेतीतील थ्री फेज डीपींची इतर रिपेअरिंग तात्काळ करण्यात यावी, यासह इतर मागण्यांसाठी मंगळवारी किसान सभेच्या वतीने तेलगाव येथील उपअभियंता कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला होता. याची दखल घेत उपअभियंता तेलगाव आणि सहाय्यक अभियंत्यांनी नित्रुड येथे येऊन किसान सभेच्या सर्व मागण्या मान्य करून तात्काळ काम सुरू करण्याचे आदेश दिले. याप्रंसगी कॉ. दत्तात्रय डाके, सय्यद रज्जाक,ॲड. अशोक डाके,जनक तेलगड,पांडुरंग उबाळे, नारायण तातोडे, सुभाष डाके,उत्तम जाधव,संदीपान तेलगड,मकरध्वज बडे,सुखदेव घुले,रामभाऊ राऊत, सुंदरराव डाके,रामभाऊ पवार,बालासाहेब गवळी,अशोक तातोडे,दत्ता आवाड, नितीन पवार, दीपक धापसे, सय्यद जिलानी, शेख मूसा, शंकर डाके, कुंडलिक काजाळे यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.