बीड : आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात बीड राज्यात दुसऱ्या स्थानी आहे. जिल्हा प्रशिक्षण संघ व रुग्णालयीन प्रशिक्षण संघाच्या संयुक्त यशाने जिल्ह्याची मान उंचावली आहे. चालू वर्षातील गुणतालिका नुकतीच एका बैठकीतून जाहीर करण्यात आली आहे.
आरोग्य विभागाच्या वतीने डॉक्टर ते आशाताई यांना विविध कार्यक्रम, उपक्रम आदींची माहिती देण्यासह मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात रुग्णालयीन व जिल्हा प्रशिक्षण संघ आहेत. येथे एका वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचारी कार्यरत आहेत. बीडमध्येही असे दोन संघ आहेत. कोरोना काळात ऑनलाइन प्रशिक्षण देऊन कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात यश आले होते. आता चालू वर्षात ऑफलाइन व ऑनलाइन प्रशिक्षण सुरूच आहे. आता ऑफलाइनमुळे गती आली असून, बीड जिल्हा राज्यात दुसऱ्यास्थानी आहे. जिल्हा प्रशिक्षण संघात पुणे तर रुग्णालयीनमध्ये मराठवाड्यातील लातूर जिल्हा अव्वल आहे. या प्रशिक्षण संघाने जिल्ह्याचे नाव उंचावले आहे.
बीडमधील प्रशिक्षण संघात डॉ.अशोक हुबेकर, डॉ. संतोष गुंजकर, आर. वाय. कुलकर्णी, अभय लोकरे, सुनीता सोनवणे, शामल गवळी, प्रकाश आव्हाळे आदी कर्मचारी कर्तव्य बजावत आहेत. या यशाबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रौफ शेख, डॉ. जयवंत मोरे यांच्यासह सर्व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी स्वागत केले आहे.
----
कोरोनामुळे मागील वर्षभरापासून ऑनलाइन प्रशिक्षण दिले जात होते. प्रशिक्षणात खंड पडू दिलेला नाही. आजही आमच्याकडून सर्वांनाच योग्य व नियमित प्रशिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पुढच्यावेळी प्रथम येण्यासाठी आम्ही नियोजन करू.
डॉ.अशोक हुबेकर, रुग्णालयीन प्रशिक्षण संघ
---
आशाताई ते डॉक्टर यांना जवळपास २५ प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. वेळ, दिवस आणि ठिकाण याचे नियोजन करून प्रशिक्षण देतो. तसेच मूल्यमापन भेटही दिली जाते. हे यश सर्वांचे आहे.
डॉ. संतोष गुंजकर, जिल्हा प्रशिक्षण संघ
---
जिल्हा प्रशिक्षण संघ गुणतालिका
प्रथम- पुणे ७४.८५ गुण
द्वितीय- बीड ६९.९० गुण
तृतीय- सोलापूर ६९.३८ गुण
---
रुग्णालयीन प्रशिक्षण संघ गुणतालिका
प्रथम - लातूर ३६.८५ गुण
द्वितीय - ३५.६१ गुण
तृतीय- उस्मानाबाद ३३.४१ गुण
170821\17_2_bed_27_17082021_14.jpg~170821\17_2_bed_26_17082021_14.jpg
डॉ.अशोक हुबेकर~डॉ.संतोष गुंजकर