धारुर : केज तालुक्यातील येडेश्वरी कारखान्यातून जालन्याकडे साखर घेऊन जाणारा ट्रक पलटी होऊन झालेल्या अपघातात चालक व क्लिनर जखमी झाले. मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास धारुर घाटातील अवघड वळणावर हा अपघात झाला.येडेश्वरी कारखान्यातून साखर घेऊन एक ट्रक (एम. एच. २०, बी. टी. ८५४६) जालन्याकडे निघाला होता. सायंकाळच्या सुमारास धारूरपासून जवळच असलेल्या घाटात अवघड वळणावर पलटी होऊन ट्रक जवळपास दोनशे फूट खोल दरीत कोसळला. या अपघातात चालक शेख इरफान व क्लिनर संतोष लव्हाळे (रा. चिखली, जि. बुलढाणा) हे दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर किल्ले धारूर येथील ग्रामीण रु ग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. घाटातील रस्ता अरु ंद असल्याने वाहन अतिशय सावकाश चालवावे लागते. घाटातील रस्ता रु ंदीकरणाच्या संदर्भात अनेक वेळा मागणी करूनही रस्ते वाहतूक रस्ते विकास महामंडळाने याकडे लक्ष दिलेले नाही. परिणामी हा अपघात घडला.
धारूर घाटातील दरीत साखरेचा ट्रक कोसळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 11:44 PM