धारूर : केज येथील येडेश्वरी साखर कारखान्याच्या साखरेचे पोते घेऊन अहमदाबादकडे जाणारा ट्रक २५० फूट दरीत कोसळला. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला असून क्लिनर बचावला आहे. शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास धारूर घाटात ही घटना घडली.
सदर ट्रक (क्रमांक-जी.यू.-३१००) अहमदाबादकडे साखरेचे पोते घेऊन चालला होता. शनिवारी रात्री १०वाजण्याच्या सुमारास हा ट्रक धारूर येथील घाटात आला असता एका वळणावर ट्रकचा ब्रेक निकामी झाला. यावेळी प्रसंगावधान राखून क्लिनर अनिल पोगचिया यांनी गाडीतून उडी मारली. यामुळे तो बचावला. परंतु ट्रक नंतर २५० फूट दरीत कोसळला. यात ट्रक चालक वनरकक्षी महेंद्रसिंग चुवासमा (वय ४०) हा गंभीर जखमी झाला आहे. सामाजिक कार्यकर्ते जयराम गायकवाड यांनी त्वरित अपघाताची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर तत्काळ तेलगााव येथील अॕब्युलन्स व डॉ.एम.बी. गायकवाड, चालक बाळासाहेब बडे, पोलीस निरीक्षक सुरेखा धस व त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी ट्रक चालकाला बाहेर काढले. त्यास प्राथमिक उपचार करून पुढील उपचारार्थ आंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला आहे.
...
फोटो ओळी-साखरेचे पोते घेऊन जाणारा अपघातग्रस्त ट्रक.
===Photopath===
160521\img-20210516-wa0148_14.jpg