पाटोदा म. : अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा, ममदापूर, देवळा, नांदडी, आकोला, अंजनपूर, तडोळा, आपेगाव ही गावे मांजरा धराणाखाली येत असल्यामुळे या भागाला ग्रीन बेल्ट म्हणून ओळखले जाते. गेल्या चार वर्षांनंतर यंदा प्रथमच मांजरा धरण १०० टक्के भरले आहे. त्यामुळे या भागात जवळपास ८० टक्के क्षेत्र हे उसाचे आहे. खोडवा उस हा शेतकऱ्यांना निव्वळ नफा देणारे पीक म्हणून ओळखले जाते. परंतु खोडवा व्यवस्थापन न केल्यास उत्पादनात घट येऊ शकते. त्यामुळे ममदापूर येथील प्रगतिशील शेतकरी गणेश बुरगे यांच्या शेतात कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी नेटाफेम कंपनीचे अरुण देशमुख यांनी कमी पाण्यात जास्त उत्पादन कसे घ्यावे. पाणी नसतानादेखील उत्पादनात इस्त्राइल अग्रेसर का आहे हे पटवून देण्यात आले. प्रगतिशील शेतकरी व नॅचरल शुगरचे संचालक पांडूरंग आवाड यांनी खत नियोजनावर माहिती दिली. रासायनिक खतांची मात्रा वाढविण्यामुळे उत्पादनात वाढ होत नसून जमिनीची सुपिकता बिघडते. त्यामुळे जमिनीची सुपिकता वाढवण्यासाठी हिरवळीचे खत, गांडूळखत, शेणखतासोबत रासायनिक खत वापरल्यास उत्पादनात नक्की वाढ होते यावर सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी संभाजी रेड्डी, शेतकी अधिकारी मदन सूर्यवंशी, ऊस विकास अधिकारी महेश धुमाळ, हनुमंत पालकर, महेश पवार, शेख आरीफ, सरपंच अरविंद बुरगे, प्रगतिशील शेतकरी अमर देशमुख, अरविंद पाटील, सत्तार शेख, बळवंत पाटील, विक्रम देशमुख, व्यंकट देशमुख, नवनाथ नरारे, नामदेव नरारे, बालाजी खोकले, लालासाहेब पवार आदी शेतकरी यावेळी उपस्थित होते.
===Photopath===
220221\222_bed_1_22022021_14.jpg
===Caption===
ममदापूर येथे ऊस खोडवा व्यवस्थापनावर मार्गदर्शन करण्यात आले.