मागील वर्षी क्वारंटाईन केल्यामुळे झाले होते हाल
बीड : कोरोनामुळे मागील वर्षी एप्रिल अखेरपर्यंत उसतोड कामगार जिल्हाबाहेर अडकून पडले होते. त्यानंतर जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी २० ठिकाणी चेकपोस्ट तयार करून लॉकडाऊन असल्यामुळे प्रशासनाने प्रत्येक मजुराला क्वारंटाईन केले होते. त्यामुळे घरापर्यंत पोहचताना अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र, यावर्षी मात्र, उसतोड मजुर विनाअडथळा स्वगृही परतू लागले आहेत. मात्र, काही लक्षणे आढळल्यास तपासणी करावी, विलगिकरणात राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे. मोठ्या प्रमाणात येथीलउसतोड कामगार हे राज्यात तसेच परराज्यातील विविध ठिकाणी ऊस तोडणीसाठी जातात. ऊस क्षेत्र वाढल्यामुळे यावर्षी साखर कारखाने उशिरापर्यंत सुरु राहतील असे चित्र आहे. तरी देखील एप्रिल महिन्यात पट्टे पडलेल्या कारखान्यांचे कामगार स्वगृही परतू लागले आहेत. या ऊसतोड मजुरांचे मागील वर्षी लॉकडाऊन असल्यामुळे मोठे हाल झाले होते. मात्र, यावर्षी उसतोड कामगार आपल्या बिऱ्हाडासह घरी परतू लागले आहेत. नाकाबंदी केलेल्या ठिकाणी पोलिसांकडून या कामगारांना मास्कचे वाटप केले जात आहे. दरम्यान कामगारांना संबंधित गावातील आशा ताईंकडून आरोग्यविषयक माहिती देण्याचे प्रशासनाचे आदेश आहेत. दरम्यान कोरोनाच्या संदर्भात काही लक्षणे आढळली तर, संबंधित रुग्णालयात जाऊन तपासणी कारवी तसेच आपल्यापासून संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन उसतोड मजुरांना करण्यात आले आहे.
जवळपास ६ लाख मजूर कामावर
बीड जिल्ह्यातून जवळपास ६ लाखापेक्षा जास्त कामगार हे राज्यातील विविध भागात व परराज्यात ऊस तोडणीसाठी जातात. पुढील काही दिवसात हे सर्व मजुर जिल्ह्यात परतणार आहेत. त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून विविध उपययोजना कराव्यात अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पक्ष जिल्हाध्यक्ष कुलदिप करपे यांनी केली आहे.
===Photopath===
270421\530527_2_bed_17_27042021_14.jpg
===Caption===
जिल्ह्यात परतु लागलेल्या उसतोड कामगारांना मास्कचे वाटप करताना वाहतू शाखा प्रमुख सपोनि कैलास भारती व कर्मचारी दिसत आहेत.