शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
2
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
3
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
4
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
5
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
6
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
7
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
8
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
9
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
10
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
11
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
12
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
13
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
14
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
15
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
16
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
17
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
18
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
19
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
20
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स

आत्महत्या शेवटचा पर्याय नव्हे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2018 12:17 AM

‘केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे’ हा सुविचार अगदी पहिलीतच आपल्याला मुकपाट होतो. परंतु याचे अनुकरण करण्यात आपणच कुठे तरी कमी पडत असल्याचे समोर येत आहे. प्रत्येकाच्या जीवनात संघर्ष आहे. संघर्षमयी प्रवासातूनच आपल्याला यशाजवळ पोहचायचे असते. यशोशिखर गाठताना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते. नैराश्य, तणाव येणे साहजिक आहे. परंतु या नैराश्यातून आणि तणावातून थेट जीवन संपविणे, हे साफ चुक आहे. या संघर्षाचा धैर्याने सामना करावा. स्वत:ला धीर द्यावा. मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. खचून न जाता आपणही यशस्वी होऊ शकतो, यावर विश्वास ठेवा आणि धडाडीने अभ्यास करा, असा सल्ला तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना दिला. आष्टी तालुक्यातील विद्यार्थिनीने स्पर्धा परीक्षेच्या तणावातून पुण्यात गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. यावरून विद्यार्थी किती अभ्यासाच्या तणावाखाली आहेत, हे स्पष्ट होते. हाच धागा पकडून ‘लोकमत’ने शनिवारी तज्ज्ञांशी संवाद साधला. यातून ‘आत्महत्या हा शेवटचा पर्याय नाही’ असा सूर निघाला.

ठळक मुद्देसंघर्षाचा करा धैर्याने सामना

अनिल भंडारी / सोमनाथ खताळ ।बीड : आष्टी तालुक्यातील बीड सांगवी येथील प्रीती गोरख जाधव या विद्यार्थिनीने स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाचा ताण आला म्हणून पुण्यात राहत असलेल्या हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन जीवन संपविले. नांदेड जिल्ह्यातील हादगाव येथेही शुभांगी जयवंतराव पौळ या विद्यार्थिनीने अभ्यासाचा ताण सहन न झाल्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

हिंगोली शहरातील तापडीया इस्टेट येथे राहत असलेल्यास सोनाली रामलिंग कीर्र्तनकार या बारावीच्या विद्यार्थिनीने आजारी असल्यामुळे अभ्यास झाला नाही. काही पेपर दिले, परंतु ते अवघड गेले. या परीक्षेत आपल्याला अपयश येईल, या भीतीने सोनालीने इमारतीच्या तिसºया मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली होती.

पुण्यातही आठवड्यापूर्वी एका सातवीच्या वर्गातील विद्यार्थिनीने अभ्यासाच्या तणावातून जीवन संपविले होते. या चारही घटना काळजाला चर्रर्र करून सोडणाºया आहेत. या सर्व घटनांचा आढावा घेतला असता विद्यार्थी अभ्यास आणि परीक्षेच्या किती तणावाखाली आहेत, हे स्पष्ट होत आहे. अभ्यास, परीक्षेचा ताण वाढत आहे. यातून आलेल्या नैराश्यातूनच विद्यार्थी जीवन संपवित आहेत.

आत्महत्या का करतात...?आयुष्यात एखाद्या समस्येवर कोणत्याही प्रकारची उपाययोजना दिसत नसल्यास वा त्या समस्येशी संघर्ष करण्याची क्षमता गमावल्याची भावना निर्माण झाल्यास व्यक्ती आत्महत्येकडे वळतो.

सध्याच्या तरूणांमध्ये नैराश्याचीभावना मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे.त्यामुळेच तरुणांच्या आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येते.अभ्यासाचा ताण, प्रेमभंग किंंवा प्रेमाला कुटूंबाकडून होणारा विरोध, कार्यालयातील कामांचा तणाव, अतिकामाने येणारा तणाव, यामुळेही अनेकजण आत्महत्येसारखे पाऊल उचलतात.सिगारेट, मद्यसेवन, अंमली पदार्थ अशा व्यसनांच्या आधीन गेलेल्यांची संख्याही वाढत आहेत. व्यसनाधिनतेची साधने सहजगत्या उपलब्ध होत असल्याने त्याचा आधार घेऊन अनेकांनी जीवन संपविल्याची अनेक उदाहरणे आहेत.

काय असतात पाल्य- पालकांच्या शंका ?मुले म्हणतात, आमचा अभ्यास खूप झाला, पण विस्मरण होते.पालक म्हणतात, मेडीकल, इंजिनियरिंंगला मुलाला पाठवायचे आहे, पण गणित विषय निघतच नाही, मुलाने मेहनत घेतली परंतु, काय होईल सांगता येत नाही. वेगळे करिअर आहे का? अशा अनेक शंका पालक उपस्थित करतात. त्यामुळे पाल्यांसह पालकही संभ्रमात असतात.

मुलांसोबत मैत्रीचे नाते ठेवा...‘मुले ही देवाघरची फुले असतात’ अशी म्हण आहे. प्रत्येकाने त्यांना आणि त्यांच्या भावनांना सांभाळावे. मुलांना जगात सर्वात जवळचे नाते म्हणजे आई-वडील हे असते. मुलांकडून त्यांनी अपेक्षा ठेवाव्यात, परंतु त्या लिमिटेड असाव्यात. त्यांच्यावर कोणतेही दडपण आणू नये. त्यांच्याशी मैत्रिचे नाते ठेवून अभ्यास करून घ्यावा. वेळप्रसंगी रागवावे, परंतु हे रागवने त्यांच्या मनाला लागेल असे असू नये. त्यांना सुधारण्याची संधी द्यावी. त्यांना आधार दिल्यास ते नक्कीच जिद्दीने लढून यशस्वी होतील, अशा प्रतिक्रियाही तज्ज्ञांनी व्यक्त केल्या.

मुलांवर अपेक्षा लादू नका, गुण ओळखा...दहावी, बारावी करिअर नसून त्यासाठीची पूर्वतयारी आहे. नेमकं काय करायचं हा जवळपास सर्वच पालकांचा प्रश्न असतो. विद्यार्थ्यांनी दहावीपासून पदवीपर्यंत इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र, बेसिक गणित, व्याकरणाचे ज्ञान वाढविले पाहिजे. कारण स्पर्धा परीक्षेचा हा पुढचा धागा असतो. विविध स्पर्धा परीक्षा, राज्य सेवा परीक्षांचा बेस बारावीला तयार झाला तर मुलांमध्ये वैफल्य येत नाही, पर्यायाने आत्महत्येसारखे पाऊल ते उचलणार नाहीत. आई वडिलांनीही पाल्याचे संभ्रम दूर करणे महत्वाचे आहे. जगात कोणताच मुलगा नाही, ज्याला काही येत नाही ही बाब समजून घेतली पाहिजे. मुलांच्या संवेदनक्षमता, गुण ओळखून तज्ज्ञांचा सल्ला घेऊन करिअर घडविले पाहिजे. पालकांनी स्वत:च्या अपेक्षा मुलांवर लादू नयेत. मुलगा जसा आहे तसा पालकांनी स्वीकार करावा, त्याच्या विकासाला वाव द्यावा. परिक्षेच्या काळात व नेहमी घरातले वातावरण हलकं- फुलकं ठेवले पाहिजे. पेपर अवघड गेले असतील तरीही त्याची चिंंता न करता पुढचे पेपर चांगला अभ्यास करुन सोडविले पाहिजे. कोणतीही भीती बाळगू नये.- शशीमोहन सिरसाटनिवृत्त विभागीय समुपदेशक, औरंगाबाद

ज्ञान व कौशल्याची सांगड घालाअभ्यास करताना ताण येणे साहजिक आहे. परंतु आत्महत्या करणे हा यावरचा पर्याय मुळीच नाही. या तणावावर मात करण्याची हिंमत ठेवावी. ज्ञान आणि कौशल्याची सांगड घालून आलेल्या परिस्थितीवर मात करणे गरजेचे आहे. आई-वडिलानंतर शैक्षणिक क्षेत्रात शिक्षकच विद्यार्थ्यांचा पालक असतो. त्यामुळे अभ्यासात काही अडचण आल्यास कुठलीही भीती मनात न बाळगता शिक्षकांना भेटून समस्या सोडवून घ्यावी. एकदा अपयश आले, म्हणजे जीवन संपले असे नाही. एकदा पडल्यानंतर पुन्हा उठून जो जोमाने धावायला लागतो, तो शर्यत जिंकल्याशिवाय राहत नाही. असेच विद्यार्थ्यांनीही करणे गरजेचे आहे. अभ्यासाचा ताण न घेता शिक्षणासोबत मैत्री करून यशाचे शिखर गाठावे.प्रा. कुमुदिनी कुरवडे-सावंत, अशोक मा.व उच्च मा.विद्या. चिंचाळा

आयुष्यात एकच परीक्षा नसते...स्पर्धेच्या जगात स्पर्धा करायचे शिकविले जाते, परंतु अपयश आल्यानंतर समुपदेशन कोणीच करत नाहीत. पालकांच्या अपेक्षा आणि सभोवतालच्या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य येते. यश- अपयश हे खेळातून शिकायला मिळते. पालकांनी आपल्या पाल्याला व शिक्षकांनी त्यांच्या विद्यार्थ्याला समजून घेणे आवश्यक आहे. आयुष्यात एकच परीक्षा नसते. कधी यश कधी अपयश येते. त्यामुळे खचण्याची गरज नाही. दहावी, बारावीची परीक्षा नववीप्रमाणेच असते, तशी वातावरण निर्मिती केली पाहिजे तरच असे प्रकार टळतील.भगवानराव सोनवणेशिक्षणाधिकारी (माध्यमिक)

आवडीच्या क्षेत्रात करिअरसाठी प्रयत्नशील रहावे...विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना अशा परीक्षांमध्ये यशवंतांनी मिळविलेले यश न पाहता त्यांनी यश मिळविण्यासाठी केलेल्या कष्टाकडे पाहणे महत्वाचे आहे. देशाला केवळ अधिकारीच नव्हेतर इंजिनिअर, डॉक्टर, लेखक, कलाकारांचीही गरज आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे. शिक्षण घेताना केवळ स्पर्धा परीक्षा हेच टारगेट न ठेवता संधी हुकल्यास घेतलेल्या शिक्षणातूनही रोजगार कसा मिळविता येईल, याकडेही लक्ष देणे आवश्यक नक्कीच आवश्यक आहे.- अमोल येडगेमुख्य कार्यकारी अधिकारी