सुवर्णा विष्णू बुऱ्हाने (वय ३८ रा. राजापिंपरी ता.गेवराई ) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. त्यांनी आपल्या राहत्या घरी स्कार्फच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवार रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्या का केली हे मात्र, अद्याप समजू शकले नाही. या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक युवराज टाकसाळ, पोकॉ. उबाळे आदींनी घटनास्थळी धाव घेतली व घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. सुर्वणा बुऱ्हाने यांच्या पश्चात पती, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर आत्महत्येच्या कारणाचा शोध पोलीस घेणार आहेत. दरम्यान याप्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
महिलेची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2021 4:34 AM