बीड : जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येचे सत्र कायम कर्ज बजारीपणा नापिकी यासह इतर कारणांमुळे मागील सात महिन्यात १०३ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. बीड तालुक्यातील ईट येथील एका शेतकºयाने आठवडी बाजारासाठी पैसे नसल्यामुळे मागील आठवड्यात गुरुवारी विष प्राशन केले होते. या शेतकºयाचा उपचारादरम्यान बुधवारी मृत्यू झाला आहे.आसाराम रावसाहेब नरनाळे असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या शेतकºयाचे नाव आहे. आसाराम हे बीड तालुक्यातील ईट येथील रहिवासी आहेत. त्यांच्याकडे एक एकर शेती आहे, शेतीतील उत्पन्न व मोल-मजुरी हा महत्त्वाचा व्यवासाय होता. मात्र, दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीतील उत्पन्नात झालेली घट, तसेच शेतातील उत्पन्न नसल्यामुळे मोल-मजूरी देखील मिळणे कठीण झाले होते. त्यामुळे आसाराम यांना मजुरी मिळत नसल्यामुळे रोजचा खर्च भागवण्याएवढे पैसे देखील मिळत नव्हते. याच मानसिकतेमधून ते खचून गेले होते. मागील गुरुवारी पिंपळनेर येथे आठवडी बाजार होता. मात्र, खरेदी करण्यासाठी पैसे नसल्यामुळे आसाराम यांनी विष प्राशन केले होते. त्यांना उपचारासाठी तात्काळ जिल्हा रुग्णालयात आणले, त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, बुधवारी आसाराम नरनाळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती गणपत डोईफोडे यांनी दिली.शासनाच्या वतीने शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. मात्र, दुष्काळी परिस्थिती, नापिकी, कर्जबाजारीपणा याला कंटाळून मागील सात महिन्यात १०३ शेतकºयांनी आत्महत्या केली आहे. यातील सर्वाची कारणे जवळपास सारखी असल्याचे दिसून येते मात्र, तरी देखील आत्महत्या रोखण्यासाठी करण्यात येणाºया उपाययोजना प्रभावीणपणे राबवल्या जात नसल्यामुळे आत्महत्या रोखण्यात यश येत नसल्याची तज्ज्ञांचे मत आहे. हे आत्महत्या सत्र रोखायचे असेल तर शासन व प्रशासनाकडून योग्य त्या उपायोजना संबंधीत लाभार्थ्यांपर्यंत पोहचतात का यासाठी विशेष कार्यक्रम राबवणे गरजचे आहे. तरच जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या सत्र थांबू शकते असे मत देखील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
बाजार आणण्यासाठी पैसे नसल्याने ईटच्या शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 12:42 AM
जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येचे सत्र कायम कर्ज बजारीपणा नापिकी यासह इतर कारणांमुळे मागील सात महिन्यात १०३ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे.
ठळक मुद्देगुरुवारी घेतले होते विष : जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू