बीड : बीडमधील सुमित वाघमारे या युवकाचा प्रेमप्रकरणातून मेहुणा बालाजी लांडगे आणि त्याचा मित्र संकेत वाघ यांनी धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना १९ डिसेंबर रोजी घडली होती. त्यानंतर आरोपींनी पलायन केले होते. यात मुख्य आरोपी अद्याप फरार असले तरी या खूनाचा कट रचनारा कृष्णा क्षीरसागर (रा.बीड) याला बीड पोलिसांनी गजाआड केले आहे. त्याच्याविरोधात गुन्हाही दाखल केला असून त्याला सोमवारी दुपारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.
सुमित वाघमारे याचा खून हा पूर्वनियोजित कट असल्याचा संशय सुरूवातीपासूनच होता. आता कृष्णा क्षीरसागर याला अटक करून कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याने याला अधिकृत दुजोरा मिळाला आहे. कृष्णाच्या सोमवारी सकाळी मुसक्या आवळण्यात आल्या. त्याला पेठबीड पोलसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. कृष्णाला बेड्या ठोकल्याने मुख्य आरोपींपर्यंत पोलिसांना पोहचण्यास मदत होणार आहे. यामुळे तपासालाही गती आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
'ऐ, वाचवा ना कुणीतरी...'; बीडमधील थरारक घटनेत मृताच्या पत्नीची बघ्यांना मदतीसाठी आर्त हाक
पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक सुधीर खिरडकर, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे, सपोनि अमोल धस, दिलीप तेजनकर, पेठबीडचे सपोनि उदावंत आणि विशेष पथके आरोपींच्या शोध घेत आहेत.