बीडमध्ये महाप्रबोधन यात्रेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटात तुफान राजकारण सुरु झाले आहे. सत्तासंघर्षानंतर पहिल्यांदाच ठाकरे गटाची बीडमध्ये मोठी सभा होत आहे. याची तयारीची पाहणी करण्यासाठी सुषमा अंधारे गेल्या असता तिथे काही पदाधिकाऱ्यांशी वाद झाल्याचे समोर आले आहे.
जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारे यांना चापटाही लगावल्याचा दावा केला होता. मात्र हे सर्व दावे खोटे असल्याचं सुषमा अंधारे यांनी सांगितलं आहे. आप्पासाहेब जाधव यांचे सर्व दावे खोटे आहे. बॅनरवर फोटो नसल्याने आप्पा जाधव रागात होते. मला मारहाण करण्याती हिंमत आप्पासाहेब जाधव यांच्यामध्ये नाही. त्यांनी कोणाच्यातरी सांगण्यावरुन एक सनसनाटी तयार करण्याचा प्रयत्न केला, असा दावा सुषमा अंधारे यांनी एक मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना केला आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, काल असा प्रकार झाला की, जे काही आम्ही स्टेजची पाहणी केली. महाप्रबोधन यात्रेची ही ग्रामीण भागातील समारोप सभा होती. तसेच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत पहिल्यांदाच महाप्रबोधन यात्रेला संबोधित बीडमध्ये करणार आहेत आणि आम्ही दोघेजण एकाच मंचावर असणार आहोत. त्यामुळे संजय राऊत असतील, मी असेल, सभा असेल, तर त्याआधी चर्चा आणि वादंग फार ओगाने आलं. तसेच या सभेला गालबोट लावण्याचा प्रयत्न ज्यांनी केला, त्यांचा प्रयत्न तितकासा यशस्वी झाला नाही, असं सुषमा अंधारे यांनी सांगितलं.
काल एक मुलागा सभास्थळी थांबला होता. त्याठिकाणी आप्पाजाधव यांची आधीपासूनच चिडचिड चालली होती. आमच्या पक्षाचे विनायक मुळ्ये नावाचे पदाधिकारी आहेत. त्यांनी आप्पासाहेब जाधव यांचा बॅनवर फोटोच छापला नाही. त्यामुळे आप्पासाहेब चिडले होते. ते त्यांनी माझ्यासमोर बोलूनही दाखवले. यानंतर मी जिल्हाप्रमुखांना सांगितले, यांचा फोटो वैगरे लावून घ्या. ते म्हणाले ताई आपण हे सर्व हॉटेवर जाऊन बोलूया. त्यानंतर मी माझ्या गाडीत बसले आणि फेसबुक लाइव्ह केला. त्यावेळी बाजूला उभा असणाऱ्या मुलाला आप्पासाहेब म्हणाले, हे सामन इकडे का ठेवलंय, ते उचला, दुसरीकडे ठेवा. त्या मुलाला त्याचा राग आला आणि तो म्हणाला तुम्ही मला का सांगतांय? मी लेबर आहे का?, यावरुन आप्पासाहेब जाधव आणि त्या मुलाचा वाद झाला. त्यांनी एकमेकांना धक्काबुक्की केली. त्यामध्ये आप्पासाहेब यांची गाडी देखील फुटली, मग आप्पासाहेब तिकडून निघून गेले, असं खुलासा सुषमा अंधारे यांनी केला. तसेच माझ्यावर पदांची विक्री करते असा आरोप त्यांनी केला. मात्र माझं बँकेचं खातं तपासायला हवं, असं आवाहन सुषमा अंधारे यांनी केलं.
दरम्यान, सभास्थळाची पाहणी करण्यासाठी आम्ही गेलो होतो. त्यावेळी अंधारे देखील त्या ठिकाणी होत्या. सध्या सुषमा अंधारे जिल्ह्यात दादागिरी करत आहेत. आमच्या पदाधिकाऱ्यांकडून पैसे मागत आहेत. त्यांच्या ऑफिसमध्ये फर्निचर, सोफे, एसी बसविण्यासाठी पैसे मागत आहेत. माझे पण पद विकत आहेत. मी पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे. परंतू यावर त्यांचे लक्ष नाही. त्यामुळेच माझे आणि सुषमा अंधारे यांचे झाले आणि म्हणूनच मी त्यांना दोन चापटा लगावल्या, अशी प्रतिक्रिया खूद्द जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी दिली होती. लगेच ठाकरे यांनी याची गंभीर दखल घेत अप्पासाहेब जाधव व संपर्क प्रमुख धोंडू पाटील यांची पक्षातून हकालपट्टी केली. सामना मुखपत्रातून याची घोषणा केली आहे.