शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

धक्कादायक ! करणीतून म्हैस मारल्याचा संशय; बदला म्हणून दाम्पत्याने केली ६ वर्षीय बालकाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2021 6:48 PM

गावातील शाळेत खेळण्यासाठी गेलेल्या शुभम उर्फ राज मोतीराम सपकाळ या ६ वर्षांच्या बालकाचा खून गावातीलच रोहिदास सपकाळ व देवईबाई सपकाळ या दोघांनी केल्याचे उघडकीस आले.

ठळक मुद्देआरोपी दाम्पत्यास ५ दिवसांची पोलीस कोठडीया प्रकरणात नेकनूर पोलिसांकडून अधिक तपास सुरू

बीड : करणी केल्याने म्हशीचा मृत्यू झाला, अशा संशयातून बदला घेण्यासाठी ६ वर्षीय बालकाचा खून केल्याची घटना ३ फेब्रुवारी रोजी बीड तालुक्यातील रत्नागिरी येथे घडली होती. अवघ्या २४ तासांत दोन आरोपींना नेकनूर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना ५ फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर केले असता, ९ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

गावातील शाळेत खेळण्यासाठी गेलेल्या शुभम उर्फ राज मोतीराम सपकाळ या ६ वर्षांच्या बालकाचा खून गावातीलच रोहिदास सपकाळ व देवईबाई सपकाळ या दोघांनी केला. दरम्यान, ‘आमच्या म्हशीवर करणी केल्याने तिचा मृत्यू झाला, त्याचा बदला घेण्यासाठी त्यांच्या मुलाचा खून केला,’ अशी कबुली मारेकऱ्यांनी दिली. दोन कुटुंबांत झालेल्या वादातून लहान मुलाचा खून झाल्याने सर्वत्र रोष होता. पोलिसांवरही आरोपी शोधण्यासाठी मोठा दबाव निर्माण झाला होता. मात्र, नेकनूर ठाण्याचे सपोनि लक्ष्मण केंद्रे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मृतदेह आढळलेल्या जागेचे अवलोकन करून, परिसरातील घरांचा व तेथील माणसांची सर्व पार्श्वभूमीची माहिती घेतली व आरोपी रोहिदास व देवईबाई या दोघांना अटक केली. दरम्यान, आरोपीने खून केल्याची कबुली दिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. गुरुवारी गुन्हा रात्री उशिरा गुन्हा दाखल झाल्यानंतर, त्यांना शुक्रवारी बीड येथील न्यायालयात हजर केले. त्यावेळी ९ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेप्रमुख लक्ष्मण केंद्रे हे करत आहेत.

ग्रामस्थांना बसला धक्कारत्नागिरी येथील बालकाचा खून संशयातून केल्याची कबुली आरोपींनी दिल्यानंतर ग्रामस्थांना धक्का बसला. दरम्यान, क्षुल्लक कारणावरून लहान मुलाचा खून करणे हे वेदनादायी असल्याची प्रतिक्रिया गावकऱ्यांनी दिली, तसेच कठोर शिक्षा करण्याची मागणीही पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

टॅग्स :MurderखूनBeedबीडCrime Newsगुन्हेगारी