केज (बीड ) : जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत गोदामातील धान्य कमी आढळून आल्याने गोदाम किपरला निलंबित करण्यात आले. अतुल केदार असे गोदाम किपरचे नाव असून निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी मंगळवारी (दि.९) निलंबनाची कारवाई केली.
शनिवारी (दि. ६) येथील शासकीय गोदामाची जिल्हा पुरवठा अधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांनी तपासणी केली. यावेळी गोदामात शिल्लक असलेल्या साठ्यानुसार तांदूळ- ५१ क्विंटल ६५ किग्रा, गहू १ क्विंटल, तूरडाळ ५ किग्रा व साखर २९ किग्रा अशी तफावत आढळून आली. यासोबत गोदामात अनेक त्रुटी आढळून आल्या. यावर पुरवठा अधिकारी कांबळे यांनी जिल्हाधिकारी यांना अभिप्राय दिला. यावरून निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी गोदाम कीपर केदार यांना निलंबित केले.