परळी शहरात तिचे आई-वडील राहतात. पूजा चव्हाणला पाच बहिणी आणि आई वडील आहेत. चव्हाण कुटुंब हे येथील नेहरू चौक परळी येथे राहतात. वसंत नगर तांडा येथे त्यांच्या वडिलांचा कुक्कुटपालनाचा व्यवसाय आहे. पूजाच्या पाच बहिणींपैकी चार बहिणीचे लग्न झाले आहे. पूजा हीच या कुटुंबाला मुलासारखी होती, ती डॅशिंगबाज होती. पूजा चव्हाण हिच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी झालीच पाहिजे. यासाठी सर्वांनी रस्त्यावर उतरले पाहिजे व पूजा चव्हाण यांच्या कुटुंबाला शासनाने न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी शांता राठोड यांनी केली आहे.
पूजा चव्हाणचा मृत्यू प्रकरणाची चौकशी करावी व तिच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा यासाठी समाजाच्या वतीने निवेदन देण्यात येणार आहे, अशी माहिती ही त्यांनी दिली. पूजा चव्हाण ही आपल्या जवळची नातेवाईक आहे. त्यामुळे तिच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे आवश्यक आहे. या प्रकारामुळे समाजातील महिला भयभीत आहेत. शासनाने संबंधित प्रकरणाची योग्य ती चौकशी करावी, अशी मागणी समाजाच्या वतीने शासनाकडे आम्ही लवकरच करणार आहोत, असेही शांता राठोड यांनी सांगितले. पूजा चव्हाण ही समाजकारणात सक्रिय होती, सक्रिय असल्याने तिचे राजकारणातील व्यक्तीशी ओळख होती, असेही त्या म्हणाल्या.