भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, कुटुंब परिवारातील कृष्णकांत परिवाराशी संबंधित शालेय समितीचे अध्यक्ष प्रा. एस. एन. कुलकर्णी यांनी माध्यमिक विद्यालयाच्या वतीने ऑनलाइन कार्यक्रमात प्रेरणादायी शौर्यगाथा प्रसंग सांगितले. उपक्रमासाठी मुख्याध्यापक प्रदीप देशमुख, नंदकिशोर झरीकर, उमेश जगताप डावखरे, रमण कुलकर्णी, शशिकांत पसारकर यांच्यासह अभ्यासपूरक मंडळ, ज्ञानोपासक मंडळांनी कार्य केले. शालेय समिती अध्यक्ष प्रमोद कुलकर्णी यांनी अध्यक्षीय समारोप करताना सांगितले की, ‘राष्ट्राय स्वाहा इदं राष्ट्राय इदं न मम’ ही उक्ती कॅप्टन कृष्णकांत कुलकर्णी यांनी सार्थ करून दाखविली. कारगिलच्या विजयाला २२ वर्षे पूर्ण होत आहेत. कॅप्टन कृष्णकांत यांना हुतात्मा होऊन २२ वर्षे झाली. कृष्णा, तुझी आठवण आल्याशिवाय एकही क्षण गेला नाही. पदोपदी तुझी आठवण येते, असे भाऊक उद्गार कुलकर्णी यांनी काढले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक व शिक्षकगण उपस्थित होते.
080721\08_2_bed_7_08072021_14.jpeg
सावरकर विद्यालय