बीड : वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या नगर - बीड - परळी रेल्वेमार्गासाठी २० ऑगस्ट रोजी प्रतिकात्मक आंदोलन होणार आहे. रेल्वेचा प्रतिकात्मक डबा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ओढत नेण्यात येणार आहे.
नगर - बीड - परळी रेल्वे हे जिल्हावासीयांचे दिवास्वप्न आहे. मात्र, अनेक वर्षांपासून हा प्रश्न शासनदरबारी प्रलंबित आहे. या रेल्वेमार्गासाठी जमीन संपादित केली असून, सध्या काम सुरू आहे. मात्र, हे काम धीम्या गतीने सुरू असून, या प्रश्नाकडे केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी २० ऑगस्ट रोजी रेल्वेचा प्रतिकात्मक डबा ओढत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत धावणार आहे. या आंदोलनात सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. हा डबा ओढण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन विद्यार्थी युवा रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष जयप्रकाश आघाव, सचिव संगमेश्वर आंधळकर, उपाध्यक्ष ॲड. गणेश करांडे यांनी केले आहे.
....