बीड : जिल्ह्यातील महसूल व पोलीस प्रशासनातील अधिकारी वाळूमाफियांवर मेहेरबान असल्याने वाळूतस्करी खुलेआम चालू आहे. याला प्रशासनाची साथ आहे, असा आरोप करीत वाळूमाफियांवर कारवाई करावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले.
सर्वसामान्य घरकुलधारकांना चढ्या दराने वाळू विकत घ्यावी लागत आहे. महसूल व पोलीस प्रशासनातील आधिकारी-कर्मचारी संगनमताने शासनाचा महसूल बुडवून जनतेची आर्थिक लूट करीत आहेत. संबंधित प्रकरणात महसूल व पोलीस प्रशासनातील अधिका-यांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात यावी, शासनाने आदेशित केल्याप्रमाणे चार ब्रास वाळू घरकुल लाभधारकांना शासनाने जप्त केलेल्या साठ्यातून देण्यात यावी. बीड तालुक्यातील पिंपळनेर हद्दीतील आडगाव, खुंड्रस, कुक्कडगाव, रंजेगाव नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात खुलेआम वाळूउपसा करणारांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत. या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते डाॅ. गणेश ढवळे व शेख युनूस यांनी धरणे आंदोलन केले. यावेळी मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.
===Photopath===
140621\14_2_bed_28_14062021_14.jpg
===Caption===
गणेश ढवळे, शेख युनूस