----------------------------
नागरिकांनी स्वच्छतेकडे दुर्लक्ष करू नये
अंबाजोगाई : कोरोनामुळे सर्वत्र दहशत पसरली आहे. राज्य शासनाने नागरिकांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचबरोबर सामाजिक जबाबदारी म्हणून सार्वजनिक स्वच्छतेकडे प्रत्येक नागरिकाने लक्ष देण्याचे आवाहन नगरसेवक डॉ. अतुल देशपांडे यांनी केले आहे.
-------------------------
नळ योजनांना तांत्रिक अडचणींचे ग्रहण
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील अनेक गावात नळ योजना अंतर्गत लाखो रुपये खर्च करून पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या. परंतु या टाक्या शोभेच्या वास्तू ठरत आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे अनेक गावात नळ योजनेचे पाणी मिळत नसल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्यासाठी इतरत्र भटकावे लागत आहे.
---------------------------
रोपवाटिका योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा
अंबाजोगाई : रोपवाटिका योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे. शेतकऱ्यांची आर्थिक समृद्धी व्हावी, यासाठी शासनाच्या राष्ट्रीय कृषी योजनेंतर्गत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर रोपवाटिका योजना नव्याने सुरू केली आहे. सदर योजना ६ लाख ४० हजार रुपये किमतीची असून लाभार्थी शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदान दिले जाणार आहे. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न असून यासाठी रीतसर अर्ज करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील मंडळ अधिकारी, कृषी पर्यवेक्षकांशी संपर्क साधावा कळविले आहे.
--------------------------------
वळण मार्गावर अपघाताची शक्यता
अंबाजोगाई :अंबाजोगाई शहरातील काही घरांचे बांधकाम नगर रचना विभागाने मंजूर केलेल्या नकाशानुसार नसल्यामुळे वळण मार्गावर अनेकवेळा अपघात होत आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे. मंजूर नकाशानुसार बांधकाम नसेल त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.