काँग्रेसचे माजलगाव तहसीलसमोर धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 12:26 AM2018-11-15T00:26:21+5:302018-11-15T00:27:10+5:30
तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत करा, या मागणीसाठी माजलगाव काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलसमोर बुधवारी सकाळी ११ वाजता धरणे आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत करा, या मागणीसाठी माजलगाव काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलसमोर बुधवारी सकाळी ११ वाजता धरणे आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र भयानक दुष्काळ पडला असून, येथील शेतकºयांची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे शेतकºयांच्या मदतीला शासनाने खंबीर उभे राहण्याचे कर्तव्य आहे. त्यानुसार तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकºयांना तत्काळ मदत देण्याची आवश्यकता असल्याने तालुका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी माजलगाव काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलसमोर बुधवारी धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी रोजगार हमीची कामे त्वरित सुरू करावीत, सुशिक्षित बेरोजगारांना राष्ट्रीयकृत बँकेत त्वरित कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे, बोंडअळीग्रस्त शेतकºयांना मदत जाहीर करावी, त्याचप्रमाणे बंधाºयावरील विद्युतमोटारीचे वीज कनेक्शन तोडू नये, शेतकºयांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत जाहीर करावी, यासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ सोळुंके तालुकाध्यक्ष भरत डक, शहराध्यक्ष शेख रशीद यासह शिवहरी सेलूकर, समियोद्दीन अन्सारी, शेख जानूशहा, मोहन तौर, अंकुश तौर, नारायण तौर, सय्यद आयास, कपिल साबळे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.