बीड : मराठा समाजातील तरुणांना उद्योग उभारणीसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कर्ज देण्यात येणार आहे. नवीन उद्दिष्टाप्रमाणे जिल्ह्यासाठी ५ हजार तरुणांना कर्जाचा लाभ होणार आहे. मात्र, अनेक प्रकरणे बँकेकडून मंजूर केले जात नाहीत अशा तक्रारी होत्या. याचा आढावा घेण्यासाठी मागील चार दिवसांपासून महामंडळाचे अध्यक्ष आ. नरेंद्र पाटील जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी आ. पाटील यांनी तरुणांना कर्ज घ्या, व्यवसाय करा, कर्ज फेडा व स्वाभिमानाने जगा असे आवाहन केले. तर ३१ मार्चपर्यंत २ हजार प्रकरणे निकाली लागतील अशी माहिती देखील पत्रकारपरिषदेत दिली.यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, काँग्रेसचे अशोक हिंगे, जगताप, नितीन धांडे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राहुल वायकरसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी आ.नरेंद्र पाटील म्हणाले, बीड जिल्ह्यासाठी ५ हजाराचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्यासाठी जवळपास ७०० ते ८०० प्रकरणे मंजूर होतील. बँक कर्ज देत नाहीत अशा अनेक तरुणांच्या तक्रारी होत्या. त्यामुळे गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बँकेचे अधिकारी व कर्जाचे प्रस्ताव प्रलंबित असलेल्या तरुणांची बैठक घेतली. यावेळी तरुणांच्या तक्रारी एकूण घेतल्या, तसेच बँकेच्या अधिकाºयांना देखील सूचना देण्यात आल्या आहेत. प्रस्तावासंदर्भात काही समस्या निदर्शनास आल्या. त्यामध्ये सुधारणा करण्याचे आवाहन तरुणांना केले आहे. त्याचबरोबर कर्ज मंजूर करण्यासाठी बँक अधिकाºयांनी देखील अडवणूक करु नये अशा सूचना दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.थेट सोक्षमोक्षअण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाशी संबंधित कर्जप्रकरणांबाबत घेतलेली ही शेवटची बैठक असून, यापुढे संबंधित तरुण व बँक अधिकाºयांची समोरासमोर भेट घडवून प्रकरण मंजूर करायला काय अडचणी आहेत त्याचा आढावा घेतला जाईल. तसेच अधिकाºयांनी मुद्दाम टाळले असेल तर कारवाई केली जाईल. समाजातील तरुण हा उद्योजक बनावा ही सरकारची व विकास महामंडळाची प्रमाणिक इच्छा असल्याचे पाटील म्हणाले.
कर्ज घ्या, व्यवसाय करा, फेडा आणि स्वाभिमानाने जगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2019 12:11 AM
मराठा समाजातील तरुणांना उद्योग उभारणीसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कर्ज देण्यात येणार आहे.
ठळक मुद्देनरेंद्र पाटील : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मार्चअखेर २ हजार प्रकरणे निकाली काढू