दिंद्रुड (बीड) :बीडच्या माजलगाव तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ५३ वर्षीय चुलत आजोबांनी घरात घुसून अल्पवयीन (१० वर्षे) नातीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
सर्वजण शेतात गेल्याने अल्पवयीन नात एकटीच घरी होती. याचा गैरफायदा घेत चुलत आजोबाने घरात घुसून अल्पवयीन नातीवर अत्याचार केला. आई शेतातून घरी आल्यानंतर घाबरलेल्या मुलीने सारी हकीकत सांगितली. त्यानंतर पिडीतेच्या आईने दिंद्रुड पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. यावरून आजोबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे संताप व्यक्त होत असून माजलगाव येथील पिंक पथकाकडे या प्रकरणाचा तपास वर्ग केला असल्याचे दिंद्रुड पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.