महाराष्टÑाच्या निवडणुकीत देशाच्या गप्पा मारणाऱ्यांना धडा शिकवा : अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 12:09 AM2019-10-16T00:09:37+5:302019-10-16T00:11:26+5:30

राष्टÑवादी काँग्रेसने सत्तेत असताना सर्व सामान्य जनतेचे हित लक्षात घेऊन स्थानिक पातळीवर जाऊन लोकांच्या, शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्याचे प्रयत्न केले. पण महाराष्टÑाच्या निवडणुकीत देशाच्या गप्पा मारत असल्याने या सरकारला धडा शिकवा, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

Teach the people of the country to talk in Maharashtra elections: Ajit Pawar | महाराष्टÑाच्या निवडणुकीत देशाच्या गप्पा मारणाऱ्यांना धडा शिकवा : अजित पवार

महाराष्टÑाच्या निवडणुकीत देशाच्या गप्पा मारणाऱ्यांना धडा शिकवा : अजित पवार

Next

कडा / आष्टी : राष्टÑवादी काँग्रेसने सत्तेत असताना सर्व सामान्य जनतेचे हित लक्षात घेऊन स्थानिक पातळीवर जाऊन लोकांच्या, शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्याचे प्रयत्न केले. पण महाराष्टÑाच्या निवडणुकीत देशाच्या गप्पा मारत असल्याने या सरकारला धडा शिकवा, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
आष्टी विधानसभा मतदारसंघाचे राष्टÑवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार बाळासाहेब आजबे यांच्या प्रचारार्थ कडा येथे मौलाली बाबा दर्गा परिसरात आयोजित सभेत ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी मीनाक्षी पांडुळे होत्या. तर व्यासपीठावर उमेदवार आजबे, माजी आ. साहेबराव दरेकर, जेष्ठ स्वांतत्र्य सेनानी साहेबराव थोरवे, रामकृष्ण बांगर, महेंद्र गर्जे, डॉ. शिवाजीराव राऊत, रामभाऊ खाडे, ठकाराम दुधावडे, आप्पा राख, सतिश शिंदे, सुरेखा तलवार, शिवाजी डोके, रूपेश बेदरे , महेबूब शेख, नवनाथ तांदळेसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पवार म्हणाले, भाषण करताना बोलले ते तोलले पाहिजे. खोटे भाषण करणे आणि फसवणूक करणे याचा धंदा झाला आहे. राज्यात शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, महिलांची सुरक्षा, वाढत जातीयवाद या प्रमुख समस्या असताना भाजपचे सरकार मेक इन इंडिया, शायनिंग इंडिया यामध्ये व्यस्त आहे. छत्रपती शिवरायांच्या नावाने सुरु केलेली शेतकरी कर्ज माफी योजना सपशेल फसवी असून हे भर सभेत पुराव्यानिशी अजित पवारांनी उपस्थितांना दाखवले. ज्याचं जळत त्यालाच कळत यामुळेच इतिहासात प्रथमच शेतकरी संपावर गेले. महाराष्टÑाची सत्ता आमच्या हातात द्या तीन मिहन्यात ७/१२ कोरा करू, असे ते म्हणाले.
बाळासाहेब आजबे म्हणाले, राजकारण करताना मी कधीच खोटे राजकारण केले नाही. इमाने इतबारे काम करत आलो. पण पंचायत समितीपासून आमदारकीच्या निवडणुकीपर्यंत धोकाच देण्याचे काम विरोधकांनी केले आहे. मतदारसंघात स्थानिक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यांची सोडवणूक करण्यासाठी मला साथ द्या आयुष्यभर उपकार विसरणार नसल्याचे आवाहन आजबे यांनी केले.
माजी आ. साहेबराव दरेकर म्हणाले, गाडी बंद पडलेल्या आमदारांची गाडी ढकलून चालु करण्याचे काम मी करत आलो.पण गाडी चालु होताच त्यांनी गाडी पळवली. पण आता बाळासाहेब आजबे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून विजयाचा गुलाल लावणार असल्याचे दरेकर म्हणाले.

Web Title: Teach the people of the country to talk in Maharashtra elections: Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.