शहरं
Join us  
Trending Stories
1
Irani Cup 2024 : रहाणेच्या नेतृत्वात मुंबई 'अजिंक्य'! २७ वर्षांचा दुष्काळ संपवला अन् इराणी चषक उंचावला
2
IndiGo Airlines: इंडिगोची यंत्रणा ठप्प; देशभरात अडकले प्रवासी, एअरलाइन्सने मागितली माफी!
3
"आधी इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ले करा", डोनाल्ड ट्रम्प यांचा इस्रायलला सल्ला
4
"रोहित शर्मा अन् टीम इंडियाला माझा सलाम..."; ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने केला कौतुकाचा वर्षाव
5
हरियाणात काँग्रेस किती जागा जिंकणार? अशोक तंवर यांचं मोठं भाकीत
6
₹९९ च्या इश्यू प्राईजच्या IPO ला जबरदस्त प्रतिसाद, ३१ वर्ष जुनी आहे कंपनी; जाणून घ्या
7
Narendra Modi : "काँग्रेसपासून सावध राहा, कारण..."; महाराष्ट्रातून पंतप्रधान मोदींनी केलं आवाहन
8
कोण आहेत शैलजा पाईक?; ज्यांना मिळाली तब्बल ७ कोटींची फेलोशिप, पुण्याशी कनेक्शन
9
सेबी प्रमुख माधबी बूच यांच्या अडचणी वाढल्या, संसदेच्या वरिष्ठ समितीने बजावले समन्स
10
इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम भारतावर होणार, सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार!
11
SBI On MTNL: संकटात आली 'ही' सरकारी कंपनी; आता SBI नं केली मोठी कारवाई, शेअर आपटला
12
जेव्हा रितेशने जिनिलीयासोबत केलेलं ब्रेकअप, अभिनेत्रीची झालेली वाईट अवस्था, म्हणाली- "त्याने मला मेसेज करून..."
13
भारतीय क्रिकेटरच्या वडीलांची २६ लाखांची फसवणूक; पैसे परत मागताच जीवे मारण्याची धमकी
14
"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा म्हणजे संविधान; राहुल गांधींचा भाजपावर घणाघात
16
१० रुपयांचं चॉकलेट, देवाचं दर्शन अन्...; अमेठी हत्याकांडात खळबळजनक खुलासा
17
हार्दिक पांड्याशी घटस्फोटानंतर नताशाचं जबरदस्त कमबॅक, शूटिंग सेटवरील व्हिडिओ समोर
18
शरद पवारांची साथ सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या महिला नेत्याशी व्यासपीठावर छेडछाड
19
मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला
20
Weightloss Tips: अमित शाहांनीसुद्धा 'या' पद्धतीने केले २५ किलो वजन कमी; सांगताहेत बाबा रामदेव!

शिक्षक भारतीचा धरणे आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 4:58 AM

गेवराई : शासनाने निर्गमित केलेले २४ ऑक्टोबर २०१७ चे परिपत्रक रद्द करुन बंद केलेल्या दिव्यांग शाळेतील कर्मचाऱ्यांची ...

गेवराई : शासनाने निर्गमित केलेले २४ ऑक्टोबर २०१७ चे परिपत्रक रद्द करुन बंद केलेल्या दिव्यांग शाळेतील कर्मचाऱ्यांची नावे आयुक्तालय स्तरावर असलेल्या अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या यादीत येत्या २० मार्चपर्यंत समाविष्ट न केल्यास २२ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोविड-१९ च्या नियमांचे पालन करून धरणे आंदोलन करण्याचा इशारा शिक्षक भारती विशेष शाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने दिला आहे.

बंद पडलेल्या शाळेतील कर्मचाऱ्यांची नावे आयुक्तालय स्तरावर ठेवण्यात आलेल्या अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या यादीत समाविष्ट करणेबाबतचे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. परंतु शाळा बंद केल्यानंतर या संस्थेने पुन्हा संधी मिळण्याबाबत शासनाकडे अपील केले. या शाळेतील कर्मचाऱ्यांचे आयुक्तालय स्तरावर ठेवण्यात आलेल्या अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या यादीत नाव समाविष्ट करू येऊ नये, असे शासनाचे परिपत्रक आहे. हे शासन परिपत्रक रद्द करून आयुक्तालय स्तरावरून बंद करण्यात आलेल्या शाळेतील कर्मचाऱ्यांची नावे आयुक्तालय स्तरावर ठेवण्यात आलेल्या अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या यादीत समाविष्ट करण्याबाबत आयुक्त, लोकप्रतिनिधी, संघटनांनी निवेदन व पत्राद्वारे विनंती केली आहे.

दिव्यांग शाळा बंद होऊन एक वर्षाचा कालावधी लोटला असून, या बंद केलेल्या शाळेतील कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. २४ ऑक्टोबर २०१७ चे शासन परिपत्रक रद्द करून राज्यातील बंद केलेल्या दिव्यांग शाळेतील कर्मचाऱ्यांचा समायोजनेचा मार्ग मोकळा करावा नसता २२ मार्चपासून विशेष शाळा कर्मचारी शिक्षक व शिक्षकेतर संघटना बीड व बीड जिल्ह्यांतील बंद पडलेल्या दिव्यांगांच्या शाळेतील सर्व कर्मचारी आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला.