बीड/वडवणी : वडवणी शहरात एका जुगार अड्ड्यावर माजलगावचे पोलीस उपअधीक्षक श्रीकांत डिसले यांनी धाड टाकली. यामध्ये शिक्षक, मुकादम, व्यापारी, प्रतिष्ठीत नागरिक अशा ३१ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तब्बल ३ लाख ८२ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मंगळवारी दुपारी ४ वाजता ही कारवाई करण्यात आली.जगन्नाथ जोशी (वाळूज, पंढरपूर), किसन जाधव (सिरसाळा), दिपक अंबुरे (लिंबगाव, ता.वडवणी), संजय खोत (माजलगाव), विठ्ठल महाजन (दिंद्रुड), वसंत काळे (पोखरी ता.बीड), शेख अन्वर (हिनानगर, बीड), नारायण मुटाळ (डिग्रस, परळी), शिक्षक महादेव गवळी (रूई ता.वडवणी), लक्ष्मण अनभुले (लिंबगाव ता.वडवणी), विलास वानखेडे (माजलगाव), बाबू सरकटे (वडवणी), दिलीप तिडके (भोगलवाडी, धारूर), शेख इसाक शेख अलाबकश (माजलगाव), शिक्षक सुधाकर पटाईत (खापरवाडी ता.वडवणी), मुकुंद देशमुख (माजलगाव), अशोक घुमरे (मैंदा ता.बीड), सुग्रीव घोलप (चिंचवडगाव ता.वडवणी), भैरव वैजिनाथ (सुर्डी ता.बीड), कुष्णा दराडे (माजलगाव), अरूण सोनार (पिंपरखेड, ता.वडवणी), शिक्षक बाबासाहेब चव्हाण (बीड), नवनाथ पुर्णे (पहाडी पारगाव ता.वडवणी), राजकुमार अंडील (पहाडी पारगाव ता.वडवणी), अमोल करपे (दुकडेगाव ता.वडवणी), लिबाजी काळे (वडवणी), भारत मायकर वडवणी, महेश खुपसे (वडवणी) अशी ताब्यात घेतलेल्या जुगाऱ्यांची नावे आहेत.बीड-परळी महामार्गावर राज कला क्रिडा सांस्कृतीक मंडळ चालू आहे. या मंडळाच्या ठिकाणी कॅरम, बुध्दिबळ व जुगार खेळला जात होता. हा जुगार परवानाधारक असल्याची अफवा होती. उपअधीक्षक डिसले यांनी तहसीलदार सुरेखा स्वामी यांना ही माहिती देत परवानगीची खात्री केली.हा अनाधिकृपणे जुगार चालत असल्याची खात्री पटताच डिसले यांच्या पथकाने धाड टाकली. यामध्ये ३१ जुगाºयांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पावणे चार लाखांचा मुद्देमालही जप्त केला. वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर अधीक्षक अजित बोºहाडे, विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक श्रीकांत डिसले, पोउपनि सोमनाथ नरके, पवनकुमार अंधारे, शैलेश गादिवार विजय केळकेंद्रे, रवी राठोड, एस.बी.शिनगारे, आय.डी.गंगावणे, एस.ए.गंगावणे, बी.डी.जाधव, एस.बी.मोरे, नायब तहसीलदार शेख , मंडळ आधिकारी सुनिता राठोड, तलाठी चव्हाण, थोरात, मंगेश बुचुडे आदींनी केली.
जुगार खेळताना शिक्षक, मुकादम, व्यापारी जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 11:53 PM
वडवणी शहरात एका जुगार अड्ड्यावर माजलगावचे पोलीस उपअधीक्षक श्रीकांत डिसले यांनी धाड टाकली. यामध्ये शिक्षक, मुकादम, व्यापारी, प्रतिष्ठीत नागरिक अशा ३१ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले.
ठळक मुद्देडीवायएसपींची कारवाई : ३ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त