लोकमत न्यूज नेटवर्ककडा : प्रशासन वा बँकेच्या हलगर्जीपणामुळे शिक्षकांचे पगार रखडले असल्यामुळे त्यांच्या दिवाळी सणाच्या आनंदावर विरजण पडले आहे.कर्मचाऱ्यांनी दिवाळीचा सण उत्साहात साजरा करावा यासाठी शासन महिना भरण्यापूर्वी वेतन देयके घेऊन कर्मचा-यांना वेतन देण्याचा प्रयत्न करते. त्यासाठी वित्त प्रेषण मंजूर करून तालुकास्तरीय अधिका-यांच्या खात्यावर रक्कम वर्ग करते. यासाठी शासन स्तरावरुन आदेश देखील दिला जातो. त्यानुसार जिल्हा कोषागार कार्यालय व मुख्य लेखा वित्त विभाग यांनी कार्यवाही करीत २३ आॅक्टोबर रोजी वित्त प्रेषण पाठवून कर्मचा-यांचा पगाराचा प्रश्न मार्गी लावला.तालुकास्तरीय गटविकास अधिका-यांनीही तात्काळ कार्यवाही करून गटशिक्षणाधिका-यांच्या खात्यावर रक्कम तात्काळ वर्ग केली होती. गटशिक्षणाधिकारी निवडणूक मतमोजणीसाठी गेल्यामुळे शिक्षकांचे पगार खात्यावर वर्ग करण्यासाठी संगणक तंत्रस्नेही शिक्षक रत्नाकर चव्हाण यांनी प्रयत्नही केले. वरिष्ठांना भेटून व बँक कर्मचा-यांना विनंती करून पगार खात्यावर मारण्याची विनंती करण्यात आली. त्यानुसार तालुक्यातील शिक्षकांची यादी व धनादेश बँकेत २५ आॅगस्ट रोजी जमाही केला. नेहमीप्रमाणे इंटरनेटचे कारण दाखवून बँकेत सदर धनादेश जमा झाला नाही. त्यामुळे तालुक्यातील सर्व शिक्षकांना पगारापासून ऐन दिवाळीत वंचित राहावे लागले व शिमगा साजरा करण्याची वेळ आली.शनिवार २६ ते २९ आॅक्टोबरपर्यंत बँकेला सुट्टी असल्याने शासनाने पगार देऊनही शिक्षकांना दिवाळीसाठी मिळाले नसल्याने भर सणासुदीच्या काळात बाजारपेठेत शिक्षकाचे पगार नसल्याने खरेदी उसंनवारीवर करण्याची वेळ आली आहे.पगार न होण्यास जबाबदार कोण ?बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्याचे पगार जमा होतात; परंतु आष्टी तालुक्यातच अशी कोणती अडचण आली की प्रशासन कोठे कमी पडले, याची उलटसुलट चर्चा होत आहे. पगार न होण्यास जबाबदार असणाºया अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे जिल्हा संपर्क प्रमुख बा .म.पवार यांनी केली आहे.
शिक्षक कर्मचाऱ्यांचा ऐन दिवाळीत शिमगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2019 12:26 AM