रस्त्याने जाणाऱ्या अल्पवयीन मुलीची छेड काढल्याची घटना ११ मे २०१८ रोजी घडली होती.याप्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात
अब्दुल रहमान ऊर्फ एरार नवाब हाश्मी याच्यावर विनयभंग व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा नोंद झाला होता. तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक आर.पी.कोलते यांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते. सरकार पक्षाने सहा साक्षीदार तपासले. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील मंजुषा दराडे यांनी न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडली.
साक्षीपुरावे व ॲड. मंजुषा दराडे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्या. हेमंत महाजन यांनी अब्दुल रहमान ऊर्फ एरार यास पोक्सो कायद्याचे कलम ७ व ८ अंतर्गत तसेच भादंवि ३२३ अंतर्गत दोषी धरुन त्यास पोक्सो कायद्यान्वये पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व दोन हजार रुपयांचा दंड तसेच भादंवि ३२३ अंतर्गत एक वर्ष शिक्षा व एक हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. पैरवी अधिकारी म्हणून सहायक उपनिरीक्षक सी.एस.इंगळे व मपोना सी.एस.नागरगोजे यांनी सहकार्य केले.