यावेळी नवरदेव नवरीने पायऱ्यांचे दर्शन घेतले. ११ मार्चला महाशिवरात्र असल्याने येथे पाच दिवसांचा भरणारा यात्रा महोत्सव कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने रद्द केला आहे. वैद्यनाथ मंदिरात नित्याची पूजा-अर्चा होणार आहे. सोमवारपासून आठ दिवस वैद्यनाथ मंदिर बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. कोरोनामुळे बाहेरून येणाऱ्या भक्तांची संख्या गेल्या आठ दिवसांपासून रोडावली आहे. मंदिर बंद असल्याने सोमवारी वैद्यनाथ मंदिराच्या पायऱ्यांचे भक्तांनी दर्शन घेतले.
वैद्यनाथ मंदिर परिसरातील श्री दक्षिणमुखी गणपती मंदिर व संत जगमित्र नागा मंदिर हे बंद ठेवण्यात आले आहे. सर्वत्र कोरोनाचे सावट असल्याने महाशिवरात्रीच्या तीन दिवसांच्या पर्वकाळात घरी बसून भगवान शंकराचे जप करून दर्शन घ्यावे, परळी येथील प्रभू वैद्यनाथ मंदिरात धन्वंतरी साक्षात आहे. भगवान शिव-पार्वती एकत्र असल्याने येथे शिवशक्तीचा संगम आहे, अशी श्रद्धा आहे.
महाशिवरात्रीला येथे होणारी गर्दी टाळण्यासाठी शासनाच्या नियमांचा सन्मान करून सर्व भक्तांनी घरी बसून वैद्यनाथाचे स्मरण करावे.
-स्वामी डॉ. तुळशीराम महाराज गुट्टे. संत साहित्याचे अभ्यासक, संस्थापक अध्यक्ष श्री सिद्धिविनायक मानव कल्याण मिशन
===Photopath===
080321\img20210308105704_14.jpg