पर्यटनस्थळांची सुरक्षा वाऱ्यावर, फोटोसेशनसाठी गर्दी
बीड : जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसाने तलाव, धबधबे ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे आपोआपच पर्यटकांची पावले तिकडे वळत आहेत. मात्र, अशा पर्यटनस्थळी हौशी तरुण जीव धोक्यात घालून सेल्फी काढण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत. त्यामुळे सेल्फीचा आनंद जिवावर बेतण्याचा धोका असून सुरक्षा वाऱ्यावर आहे.
...
धोक्याची सूचना देणारे फलकही गायब
पर्यटनस्थळी तेथील पाणी, खोलीचा अंदाज व पर्यटकांसाठी आवश्यक त्या सूचनांचे फलक लावलेले असतात. मात्र, काही ठिकाणचे फलकही गायब आहेत. विशेष म्हणजे पर्यटकांना आवरणारे, त्यांच्या सुरक्षेबाबत खबरदारी घेणारेही तेथे कोणी नसते. त्यामुळे कोणीही या अन् जीव धोक्यात घालून सेल्फी काढा... असेच चित्र आहे.
....
पर्यटनस्थळी फिरायला जाताना नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी. लहान मुलांना धोकादायक ठिकाणी नेऊ नये. निर्जनस्थळी पर्यटनाला जाणे टाळावे. फोटोसेशनसाठी खोल पाण्यात उतरू नये. पर्यटनस्थळी छेडछाड झाल्यास तातडीने नजीकच्या पोलीस ठाण्यांना कळवावे.
- सुनील लांजेवार, अप्पर अधीक्षक, बीड.
...
पर्यटनाला जा, पण काळजी घ्या...
सौताडा : बीड-जामखेड रस्त्यावर पाटोदा तालुक्यात सौताडा आहे. खोल दरीत मंदिर आहे. रस्ते निसरडे असतात. खोल दरी असल्याने पोहणे टाळावे व योग्य ती काळजी घ्यावी.
कपिलधार : बीड तालुक्यातील कपिलधार येथे जाण्यासाठी मांजरसुंबा घाटातून रस्ता आहे. रस्ता तीव्र उताराचा असल्याने वाहने सावकाश चालवावीत. धबधबा सुरू असताना कुंडात उतरणे टाळावे.
बिंदुसरा : धुळे-सोलापूर महामार्गावर पाली शिवारात बिंदुसरा प्रकल्प आहे. चादरीवरून पाणी वाहताना संरक्षक भिंतीवर चढून फोटो काढणे टाळावे; तसेच गर्दी करू नये.
....
120921\12bed_1_12092021_14.jpg
सौताडा३