माजलगाव: जिल्ह्यात शुक्रवारपासून लॉकडाऊन होणार असल्याने सलग दुसऱ्या दिवशी मोंढयातील किराणा दुकानात दिवसभर गर्दी होती. यामुळे मोंढयातून चालणे देखील अवघड झाले होते.
बीड जिल्ह्यासह माजलगाव शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. यामुळे प्रशासनाने बुधवारी सकाळी पुढील १० दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. लॉकडाऊनची घोषणा होताच येथील मोंढयात किराणा होलसेल व रिटेल दुकानात किराणा भरण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तर गुरुवारी सकाळपासूनच मोंढयात मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.
मोंढयात जिकडे पहावे तिकडे नागरिक दिसत होते. तर जागोजागी ऑटोरिक्षा,मालवाहू रिक्षा , टेम्पो , टँकर ,ट्रक , मोटारसायकल आदी वाहने कोठेही आडवी उभी लावल्याने जागोजागी ट्राफिक जाम झाली होती.यामुळे दिवाळीसारखी गर्दी झाल्यासारखे पहावयास मिळत होते. मोंढयात मोठया प्रमाणावर गर्दी झालेली असतांना व या ठिकाणी वाहने कशीही लावलेली असतांना पोलीसांचे याकडे मात्र दुर्लक्ष दिसून आले.
===Photopath===
250321\img_20210325_125750_14.jpg