परळी : राष्ट्रवादी काँग्रेसचे येथील माजी नगरसेवक पांडुरंग गायकवाड यांच्या खुन प्रकरणी गुरु वारी परळीच्या संभाजीनगर पोलिस ठाण्यातील डी.बी.पथकाने एका आरोपीस ताब्यात घेतले आहे, विजय बल्लाळ वय २४ रा.गौतम नगर, ता.परळी वैजनाथ,जि.बीड असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.त्यास सायंकाळी अटक करण्यात आली. दोन दिवसांपुर्वी मगर बल्लाळ यास जेरबंद केले. घटना घडल्यानंतर कांही तासात ८ आरोपी ताब्यात घेतले होते. आता अटक आरोपींची संख्या एकुण १० झाली असून एक आरोपी अटक होणे बाकी आहेशहरातील प्रभाग ८ मधील उड्डाणपुलाखाली २५ मार्च रोजी पहाटेच्यावेळी माजी नगरसेवक पांडुरंग गायकवाड यांच्यावर तलवार व लाकडी दांड्याने वार करु न त्यांचा खून करण्यात आला. याप्रकरणी प्रविण गायकवाड यांनी संभाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यावरु न एकूण ११ आरोपींविरु ध्द खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. अंबाजोगाईचे अतिरिक्त जिल्हा पोलिस अधिक्षक अजित बोºहाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश गायकवाड, संभाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी २५ मार्च रोजीच ८ आरोपींना अटक केली . तसेच आरोपींकडून तलवार व लाकडी दांडे जप्त केले. दोन दिवसापुर्वी मंगळवारी मगर बल्लाळ यास पोलिस कर्मचारी सचिन सानप यांनी परभणी जिल्ह्यात ताब्यात घेतले व अटकेची कारवाई केली. त्यास रविवारपर्यंन्त पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तर ८ आरोपींची बीडच्या जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.गुरुवारी विजय बल्लाळ यास संभाजीनगर पोलिस ठाण्याच्या डी.बी.पथकाचे जमादार रमेश सिरसाट, मधुकर निर्मळ, दत्तात्रय गित्ते, लाला बडे यांनी अटक केली. त्यामुळे आता अटक झालेल्या आरोपींची संख्या एकूण १० झाली आहे.
परळी खून प्रकरणी दहा जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2019 12:29 AM