नागरिकांत भीतीचे वातावरण
वडवणी : कधी पाऊस तर कधी कडक ऊन यामुळे शेतकरी व नागरिकांची तारांबळ उडत असून त्यातच कोरोनाचा वाढता कहर व वातावरणातील बदलाने होणारे आजार यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
‘रोहयो’ची कामे सुरू करा
वडवणी : सध्या कोविडमुळे लाॅकडाऊनच्या काळात नागरिकांनी घरीच थांबावे, असे आवाहन केले जात आहे. मात्र ज्यांचे हातावर पोट आहे, अशा मजुरांची घरसंसार करताना कसरत होत असल्याने ग्रामीण भागात ‘रोहयो’ची कामे सुरू करून रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी मजूर करीत आहेत.
घरगुती गॅसचे दर कमी करा
वडवणी : कोरोना संकटात महागाईचा आलेख वरचढ होत आहे. घरगुती गॅसचे दरही मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हाताला काम नाही. परिणामी गृहिणीचे बजेट कोलमडले आहे. त्यामुळे सरकारने घरगुती गॅसचे दर कमी करण्याची मागणी महिला वर्गातून होत आहे.