लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : माजलगाव शहरासह तालुक्यातील सर्व मिस्त्री, गुत्तेदार, लेबर, प्लंबर, वॉटरमॅन, पेंटर, वीटभट्टी मालक-कामगार, स्लायडिंग कामगार, सुतार, फॅब्रिकेशन इ कामगार - मालकांचा व मजुरांच्या न्याय विविध मागण्यासंदर्भात समाजवादी पार्टीच्या वतीने समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष मुजमिल पटेल यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय कार्यालयासमोर थापी-टोकरा आंदोलन करण्यात आले.माजलगाव तालुक्यातील कामगार-मालक व मजुरांच्या न्याय व हक्कासाठी शासन दरबारी न्याय मिळावा त्यासाठी समाजवादी पार्टीच्यावतीने मध्ये प्रदेश व तेलंगणा राज्याप्रमाणे वाळू टेंडर न देता तहसील मार्फत रॉयल्टी घेऊन वाळू विक्री करण्यात यावी व १२ महिने वाळू उपलब्ध करून देण्यात यावी, शासन नोंदीत कामगारांना दुष्काळ जाहीर करून शासन नोंदीत कामगारांना २५ हजार रूपये आर्थिक मदत जाहीर करावीत. या प्रमुख मागण्यासह विविध मागण्यांसाठी उपविभागीय कार्यालयासमोर थापी-टोकरा धरणे आंदोलन करण्यात येणार आले. यावेळी समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष मुजम्मिल पटेल यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील कामगार - मालक व मजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते.दुष्काळ जाहीर करुन २५ हजाराची मदत द्याशासन नोंदीत कामगारांना दुष्काळ जाहीर करुन शासन नोंदीत कामगारांना २५ हजार रुपये आर्थिक मदत जाहीर करावीत, अशी मागणी यावेळी आंदोलनकत्यांनी केली.यावेळी समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष मुजम्मिल पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार, मालक, मजूर आंदोलनात सहभागी होते.
उपविभागीय कार्यालयासमोर थापी-टोकरा आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 11:54 PM
माजलगाव शहरासह तालुक्यातील सर्व मिस्त्री, गुत्तेदार, लेबर, प्लंबर, वॉटरमॅन, पेंटर, वीटभट्टी मालक-कामगार, स्लायडिंग कामगार, सुतार, फॅब्रिकेशन इ कामगार - मालकांचा व मजुरांच्या न्याय विविध मागण्यासंदर्भात समाजवादी पार्टीच्या वतीने समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष मुजमिल पटेल यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय कार्यालयासमोर थापी-टोकरा आंदोलन करण्यात आले.
ठळक मुद्देमिस्त्री, गुत्तेदार, कामगार, आक्रमक : मध्यप्रदेश, तेलंगणाप्रमाणे वाळू टेंडर न देता तहसीलमार्फत रॉयल्टी घेऊन वाळू विक्री करावी