- सोमनाथ खताळबीड : राष्ट्रसंत भगवानबाबा यांचे जन्मस्थान असलेल्या पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट ( Dussehra Melava will be held at Savargaon ) येथील भगवान भक्तिगडावर ( Bhagwan Bhaktigad ) दसरा मेळावा होणार असल्याचे निश्चीत झाले आहे. पोलिसांनी या मेळाव्याला कोरोना नियमांची अट घालून परवानगी दिली आहे. आता या मेळाव्याला अवघे दोन दिवस उरले असून भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे ( Pankaja Munde ) दसरा मेळाव्यात काय बोलतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे ( Gopinath Munde ) यांनी दसरा मेळाव्याची परंपरा सुरू केली होती. ती परंपरा पुढे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी कायम ठेवली आहे. मागील चार वर्षांपासून संत भगवानबाबा ( Saint Bhagwan Baba ) यांचे जन्मस्थान असलेल्या सावरगाव येथे दसरा मेळावा घेण्यात येत आहे. १५ ऑक्टोबर रोजी दसरा असून मेळाव्याची पूर्ण तयारी केली जात आहे. मागील वर्षी कोरोना संसर्गामुळे दसरा मेळावा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आला होता. यंदाही कोरोनाचे सावट असल्याने हा मेळावा कसा होणार? याकडे लक्ष लागले होते. अखेर हा मेळावा होणार असल्याचे निश्चीत झाले आहे. अंमळनेर पाेलिसांनी कोरोना नियमांची अट घालून ही परवागनी दिली आहे. आता या मेळाव्याला कोण कोण उपस्थित राहणार आणि पंकजा मुंडे काय बोलतात? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. दसरा मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन पंकजा मुंडे यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील धरणे आंदोलनातून कार्यकर्त्यांना केले आहे.
अटीसह परवानगीकोरोना नियमांचे पालन करण्याची अट घालून सावरगाव घाट येथे दसरा मेळाव्याला परवानगी देण्यात आली आहे. गर्दी जमवू नये, सुरक्षित अंतर ठेवून मास्क लावण्याचे आवाहन करण्याबाबतही सुचना केल्या आहेत.- गोरक्ष पालवे, सहायक पोलिस निरीक्षक, पोलीस ठाणे अंमळनेर