बीड- मुलगी बारावीत शिकणारी तर मुलगा बी. कॉमच्या द्वितीय वर्षात चार वर्षांची ओळख, मैत्री अन् नंतर प्रेम, दोघे भिन्न जातीचे, मुलीने बारावीचा शेवटचा पेपर दिला अन् मुलासोबत धूम ठोकली. १८ वर्ष पू्र्ण झाल्यानंतर दोन दिवसांनी त्यांनी लग्नगाठ बांधली. मात्र त्यापूर्वीच त्याने तिच्यावर अत्याचार केल्याने हाती बेड्या पडल्या. शहर ठाणे हद्दीत १२ जून रोजी हा प्रकार समोर आला.
पोलिसांच्या माहितीनुसार, दीपक शंकर कानडे याची बीडमधीलच १७ वर्षीय मुलीशी चार वर्षांपासून ओळख होती. तिने शहर ठाणे हद्दतील महाविद्यालयात प्रात्यक्षिकचा पेपर दिल्यावर २२ फेब्रुवारी २०२२ रोजी दुचाकीवरुन त्या दोघांनी धूम ठोकली. दीपकचा मावसभाऊ इंदर अशोक खरात यांच्याकडे गेले, त्याने किरायाची कार दिली. त्यातून ते नाशिकला गेले.
काही दिवसांनी औरंगाबादला आले. २ जुलै रोजी मुलीला १८ वर्षे पूर्ण झाले. ५ एप्रिल रोजी त्यांनी विवाह केला. त्यानंतर ते पनवेलला गेले. औरंगाबादेत लग्नापूर्वी खोली भाड्याने घेऊन ते राहिले. यावेळी दीपकने बळजबरीने अत्याचार केला. दीपकवरील अपहरणाच्या गुन्ह्यात बाललैंगिक अत्याचार, बलात्काराचे कलम वाढविले.
पोलीस मागावर असल्याने स्वत:हून ठाण्यात-
दरम्यान अपर अधीक्षक सुनील लांजेवार, उपअधीक्षक संतोष वाळके यांनी प्रकरण गांभीर्याने घेतले होते. पोलीस निरिक्षक रवी सानप, सहायक निरिक्षक महादेव ढाकणे यांनी तपास करुन त्या दोघांचा माग काढला. मात्र पोलीस मागावर असल्याची कुणकुण लागताच पीडित मुलीला घेऊन दीपक कानडे १२ जून रोजी स्वत:हून शहर ठाण्यात हजर झाला. मावसभाऊ इंदर खरातलाही बेड्या ठोकल्या.