शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

मुख्यमंत्र्यांनी विचारले पैसे मिळाले का?शेतकऱ्यांनी थेट मंत्र्यांच्या मोबाईलवर मेसेज केले 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 7:10 PM

खात्यात दोन हजारांचा हप्ता अन् ई-पीक पाहणीची अट रद्द झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे  

परळी (बीड): येथे बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या कृषी महोत्सवात नमो शेतकरी महासन्मान योजनेचा प्रत्येकी दोन हजार रुपयांचा हप्ता एका क्लिकवर ९१ लाख शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पैसे मिळाले का? असे विचारताच कार्यक्रम स्थळी बसलेल्या शेतकऱ्यांनी खात्यात पैसे जमा झाल्याचे मेसेज थेट मंत्र्यांना त्यांच्या पीए मार्फत पाठवत दुजोरा दिला. 

बुधवारी कृषी महोत्सवाच्या उद्घाटनाच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या चौथ्या हप्त्याचे ऑनलाईन वितरण करण्यात आले. 

त्याचबरोबर कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या विनंतीवरून सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी ई-पीक पाहणीची घातलेली अट मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात रद्द करत असल्याचे जाहीर केले. याचा दुहेरी आनंद झालेल्या शेकडो शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच कृषी मंत्री यांचे आभार मानणारे मेसेजेस धनंजय मुंडे यांच्या स्वीय सहाय्यकांकडे पाठवले व आपले मेसेज मान्यवरांपर्यंत पोहोचवण्याची विनंती केली. धनंजय मुंडे यांच्या स्वीय सहाय्यकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना शेतकऱ्यांनी पाठवलेले ते मेसेज दाखवले असता त्यांनी समोर बसलेल्या शेतकऱ्यांना हात उंचावून दाद दिली. खात्यात दोन हजारांचा हप्ता अन् ई-पीक पाहणीची अट रद्द झाल्याने मोठा दिलासा मिळाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :BeedबीडEknath Shindeएकनाथ शिंदेDhananjay Mundeधनंजय मुंडेAjit Pawarअजित पवारFarmerशेतकरी