शहरं
Join us  
Trending Stories
1
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
2
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
3
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
5
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
7
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
8
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
9
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
10
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
11
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
12
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
13
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
14
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
15
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
16
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
17
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
18
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
19
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
20
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई

बीडमध्ये गुलालमुक्त गणेश विसर्जनाची संकल्पना; मंडळे म्हणाली, आम्ही फुले उधळणार

By सोमनाथ खताळ | Published: September 26, 2023 2:21 PM

पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद : १६४ गणेश मंडळांकडून गुलाल मुक्त गणेशोत्सव साजरा करण्यास सहमती

बीड : गुलालामुळे सामाजिक सलोखा बिघडतो. आतापर्यंत अशा अनेक घटना घडल्या आहेत. पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सुचविलेली गुलालमुक्तीची संकल्पना सर्वांना आवडत आहे. स्थानिक पोलिसांकडूनही समज, गैरसमज समजावून सांगितले जात आहेत. त्यामुळेच १६४ मंडळांनी यावर्षीचा गणेशोत्सव गुलालमुक्त साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय डीजेऐवजी पारंपरिक वाद्य वाजविणार आहेत. आम्ही गुलालाऐवजी फुले अन् पाकळ्या गणेश मूर्तीवर उधळणार आहोत. आपणही असेच करावे, असा सल्ला गुलालमुक्त उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांनी इतरांनी दिला आहे.

लाडक्या गणरायाचे १९ सप्टेंबर रोजी आगमन झाले. जिल्ह्यात १५९२ ठिकाणी गणेश मूर्तींची प्रतिष्ठापणा करण्यात आली. बाप्पाचे आगमन दणक्यात झाले. दोन दिवसांपासून पावसानेही हजेरी लावल्याने गणेश भक्तांचा आनंद द्विगुणित झाला आहे. त्यामुळे आता विसर्जनाचीही तयारी मंडळांकडून केली जात आहे. देखाव्यांसह सजावटीचे नियोजन केले जात आहे. दुसऱ्या बाजूला प्रशासन, पोलिसांचीही तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. विशेष बंदोबस्तासह रस्ते चकाचक केले जात आहेत. परंतु, याच विसर्जन मिरवणुकीत गुलालाची उधळण मोठ्या प्रमाणात होते. याच गुलालावरून आतापर्यंत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. एवढेच नव्हे तर याच गुलालात केमिकल, कचखडी, बारीक कण असल्याने अवयव आणि आरोग्यासही घातक ठरू शकतात. हाच धागा पकडून पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी यावर्षीचा गणेशोत्सव गुलालमुक्त साजरा करण्याचा निर्णय घेतला. गुलालाऐवजी फुले, पाकळ्या उधळा असे आवाहन त्यांनी केले. याला मंडळांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत १६४ मंडळांनी यासाठी सहमती दर्शवली आहे. हा आकडा आणखी वाढेल, असा विश्वासही ठाकूर यांनी व्यक्त केला.

पेठबीडसह ६ ठाणेदारांचे अपयशएसपी ठाकूर यांची संकल्पना यशस्वी करण्यासाठी २८ पैकी २२ ठाणेदारांनी विशेष परिश्रम घेतले. मंडळांच्या नावासह त्यांनी यादी विशेष शाखेला पाठविली. परंतु, बीड शहरातील सर्वांत महत्त्वाचा आणि संवेदनशील असलेल्या पेठबीड पोलिसांकडून एकाही मंडळाचे समुपदेशन झाले नाही. त्यासोबतच बीड ग्रामीण, वडवणी, अंमळनेर, नेकनूर, पिंपळनेर यांचा समावेश आहे. या ठाण्यांच्या हद्दीत एकानेही सहमती दर्शवली नाही. हे ठाणेदार मंडळांशी संवाद ठेवण्यात अपयशी ठरले की यादी पाठविण्यास उशीर झाला, हा प्रश्न आहे.

काय म्हणतात मंडळांचे पदाधिकारी....गुलालमुक्तची संकल्पना आवडलीमागील ५० वर्षांपासून गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करत आहोत. सलोख्यासाठी पोलिसांनी सुचविलेली गुलालमुक्तची संकल्पना आम्हाला आवडली. याचे फायदे, तोटेही आम्हाला समजावून सांगितले. त्यामुळेच गुलालाऐवजी फुले अन् पाकळ्यांचा वापर करू. - गणेश शेळके, सिद्धेश्वर गणेश मंडळ, माजलगाव

फुले उधळणारगुलालामुळे वाद होतात, हे खरे आहे. त्यामुळेच पोलिसांच्या संकल्पनेला आम्ही सहमती दर्शवली. मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी गुलालाऐवजी फुले उधळणार. तसेच, डीजेऐवजी पारंपरिक वाद्य वाजवू. -सचिन घाटे, गरूडा गणेश मंडळ, केसापुरी कॅम्प

आनंदोत्सव शांतता, शिस्तीत असावागुलालामुळे अनेक ठिकाणी वाद होतात. तसेच, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो. आनंदोत्सव करावा, याला आमची सहमती आहे. परंतु, तो शांतता आणि शिस्तीत असावा. आम्ही डीजे व गुलालमुक्तची संकल्पना हाती घेतली. सर्व ठाणेदारांना सूचना देऊन जनजागृती करण्यास सांगितले. याला मंडळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आतापर्यंत सहमती दर्शविणाऱ्या मंडळांची संख्या १६४ झाली आहे. पुढे आणखी हा आकडा वाढेल, असा विश्वास आहे. ही संकल्पना सत्यात उतरली तर जिल्हा आदर्श ठरेल, यात दुमत नाही.- नंदकुमार ठाकूर, पोलिस अधीक्षक, बीड

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जनGanpati Festivalगणेशोत्सवBeedबीड