शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकून बिबट्याचा मृत्यू; भानकवाडी शिवारातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2022 5:36 PM

भानकवाडी येथील दोरखडा शेतशिवारात दुपारी वाघूरीत बिबट्या अडकल्याची वार्ता परिसरात पसरली

शिरूर कासार : तालुक्यातील भानकवाडी दोरखडा शेत शिवारात शिकाऱ्याने लावलेल्या वाघूरीत (जाळ्यात) अडकल्यामुळे बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. घटनास्थळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन सदरील घटनेबाबत अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भानकवाडी येथील दोरखडा शेतशिवारात दुपारी वाघूरीत बिबट्या अडकल्याची वार्ता परिसरात पसरताच सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्राचे संचालक वन्यजीव अभ्यासक सिद्धार्थ सोनवणे व वनरक्षक बद्रीनाथ परजने, जिल्हा कृषी अधिकारी सुभाष साळवे, डॉ. अशोक गायकवाड यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी अशोक काकडे व वनपाल साधू धसे यांना बिबट्या जाळ्यात अडकल्याची माहिती दिली. त्यानंतर तत्काळ वनपरिक्षेत्र अधिकारी अशोक काकडे व वनपाल साधू धसे हे घटनास्थळी दाखल झाले.

वाघूरीत (जाळ्यात) अडकलेल्या बिबट्याची व जागेची पाहणी आणि पंचनामा केला. त्यानंतर घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. बोरघरे मॅडम, डॉ. प्रदीप आघाव, डॉ. मोहळकर, डॉ. लकडे यांना बोलावून घेत जागेवरच इन कॅमेरा बिबट्याचे शवविच्छेदन केले. विभागीय वन अधिकारी सचिन कंद यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्यावर पिपळवंडी ता. पाटोदा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी अशोक काकडे, वनपाल साधू धसे, वन्यजीव अभ्यासक सिद्धार्थ सोनवणे, वनरक्षक बद्रीनाथ परजने, शेळके, शिवाजी आघाव आदी वनकर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिकारींकडे दुर्लक्ष नकोवन्यजीव संरक्षण कायदा १९७२ च्या कलम ९ प्रमाणे वनरक्षक बद्रीनाथ परजणे यांचे फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी अशोक काकडे व साधू धसे हे करत आहेत. भानकवाडी दोरखडा शेतशिवारात झालेल्या बिबट्याच्या मृत्यूमुळे वनक्षेत्रात वन्यजिवांची शिकार होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे यापुढे वनविभागाला सतर्क राहावे लागणार आहे.

टॅग्स :leopardबिबट्याBeedबीडforestजंगल