शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

मांजरा नदीच्या पुरामुळे फक्राबादचा बंधारा फुटला; बीड, धाराशिव जिल्ह्यांची वाहतूक ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 12:48 PM

तीन दिवसांपासून मांजरा जलाशयाच्या वरील भागातील पाणलोट क्षेत्रातील पाटोदा, चौसाळा व नांदुरघाट परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे मांजरा नदीला मोठा पूर आला.

केज (जि. बीड) : मांजरा नदीला माेठा पूर आल्याने केज आणि कळंब तालुक्याच्या सीमेवरील फक्राबाद येथील बंधाऱ्याच्या दाेन्ही बाजूने रस्ता वाहून गेला. त्यामुळे रविवारी सकाळपासून बीड व धाराशिव जिल्ह्याची वाहतूक ठप्प झाली आहे.

तीन दिवसांपासून मांजरा जलाशयाच्या वरील भागातील पाणलोट क्षेत्रातील पाटोदा, चौसाळा व नांदुरघाट परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे मांजरा नदीला मोठा पूर आला. नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. या पुरात मोठमोठी झाडे, झुडपे वाहून आल्यामुळे बीड आणि धाराशिव जिल्ह्यातील कळंब व केज तालुक्याच्या सीमेवर आसलेल्या फक्राबाद येथील कोल्हापुरी बंधाऱ्याच्या दोन्हीही बाजूचा रस्ता खचला. त्यामुळे डोकेवाडी, गिरवली, जानकापूर, पारगाव, हिंगणी (बु.), हिंगणी (खुर्द), फक्राबाद, लाखनगाव, पारा, डोंगरेवाडी, सात्रा, खोंदला व भोपला असे एकूण १३ कोल्हापुरी बंधारे ओव्हरफ्लो झाले. संगमेश्वर मध्यम प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी वाहत असल्याची माहिती मांजरा जलाशयाचे सहायक अभियंता सूरज निकम यांनी ‘लोकमत’ला दिली.

मांजरा जलाशयात ३१.०८ टक्के पाणीसाठामांजरा जलाशयात रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या नोंदीनुसार ३१.०८ टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती मांजराचे विकास ठोंबरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. रविवारी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान रस्ता वाहून गेल्यामुळे बीड जिल्ह्यातील केज आणि धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्याच्या सीमेवरून होणारी वाहतूक व दळणवळण सकाळपासून ठप्प झाल्याची माहिती फक्राबादचे माजी सरपंच दिनकर मोराळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 

टॅग्स :BeedबीडManjara Damमांजरा धरणfloodपूर