शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
4
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
5
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
6
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
7
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
8
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
9
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
10
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
11
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
12
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
13
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
14
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
15
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
16
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
17
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
18
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
19
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
20
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा फरार पोलिस शिपाई अखेर अटकेत 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 2:25 PM

दीड महिन्यांपासून आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता

- नितीन कांबळेकडा: नवप्रविष्ट पोलिस शिपायाने मुंबईवरून गावी येऊन नातेसंबंधातील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना  फेब्रुवारी महिन्यातील 'प्राॅमिस 'डे' च्या दिवशी घडली होती. याप्रकरणी १५ फेब्रुवारी रोजी आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून फरार असलेल्या मुख्य आरोपीस पोलिसांनी गुरुवारी रात्री ताब्यात घेतले.

आष्टी तालुक्यातील एका गावातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर नातेसंबंधातील एका नवप्रविष्ट पोलिस शिपायाने मुंबई येथे क्कार्टरला असताना ११ फेब्रुवारी रोजी गावी येऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता.याकामी त्याच्याच गावातील दोन मित्रांनी त्याला मदत केली होती. आष्टी पोलिस ठाण्यात १५ फेब्रुवारी रोजी अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून आरोपी फरार होते. 

दरम्यान, १५ दिवसांपूर्वी पिंक पथक प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक धरनीधर कोळेकर यांच्या पथकाने वेशांतर करत थेट उसाचा फड गाठला. टॅक्टरवर चालक म्हणून काम करत असलेला समीर खेडकर व जवळच गॅरेजवर काम करत असलेला हरिओम खेडकर या गुन्ह्यात मदत करणाऱ्या दोघाजणांच्या मुसक्या आवळल्या होत्या. तर आष्टी तालुक्यातील एका गावात मुख्य आरोपी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी त्याच्या गुरूवारी रात्रीमुसक्या आवळल्या. ही कारवाई पिंक पथक प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक धरनीधर कोळेकर, पोलीस हवालदार शरद टेकाळे,मुद्दशर शेख,नितीन साप्ते यांनी केली. फरार कालावधीत मुख्य आरोपी पोलिस शिपायाना बीड न्यायालयात अटक पूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. पण न्यायायलयाने तो जामीन अर्ज फेटाळला होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड