केज ( बीड) : जिल्ह्यात मोटार सायकल आणि वाहन चोरीच्या घटनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे सार्वजनिक ठिकाणी वाहन चोरीच्या घटना घडत असताना आता चोरट्यांनी आता आपला मोर्चा न्यायालय परिसरात लावलेल्या दुचाकीकडे वळवला आहे केज न्यायालय परिसरात लावलेली एका वकिलाची दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना गुरुवार दि.६ ऑक्टोबर रोजी घडली आहे या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केज न्यायायलताच्या परिसरात पार्क केलेली एका वकिलाची मोटार सायकल चोरीला गेली आहे. केज येथील न्यायालयात वकिली करणारे विधीज्ञ चंद्रकात बचुटे यांनी गुरुवार दि.६ ऑक्टोबर रोजी त्यांची होंडा शाईन ही मोटार सायकल क्र. (एम एच-२३/ए क्यू-०८६०) ही केज न्यायायलयाच्या परिसरात उभी केली होती. दुपारी मध्यंतरा नंतर ते त्यांचे न्यायालयीन काम आटोपल्या नंतर ते घरी जाण्यासाठी निघाले असता मोटार सायकल उभी केली तेथे जाऊन पाहिले तेथे त्यांची मोटार सायकल आढळून आली नाही. त्यांनी परिसरात सर्वत्र शोध घेतला; मात्र मोटार सायकल सापडली नाही. म्हणून त्यांनी दि. ६ ऑक्टोबर रोजी केज पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्या नुसार केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. ४४९/२०२३ भा. दं. वि. ३७९ नुसार अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल श्रीकांत चौधरी हे पुढील तपास करीत आहेत.