शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची उमेदवारी मिळाली नाही, महादेव जानकर नाराज? माजी मंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं
2
"भोलेबाबा परम ब्रह्म, ज्यांचं मरण आलं होतं, त्यांचाच जीव गेला’’, सूरजपालच्या सेवेकऱ्याचा दावा   
3
४५ तोळं सोनं अन् व्यवसाय शेती, स्वत:ची गाडीही नाही; पंकजा मुंडेंची संपत्ती किती?
4
Rohit Sharma : विश्वविजेता कर्णधार रोहित शर्माचा जलवा कायम; 'मुंबईचा राजा' प्रसिद्धीच्या शिखरावर! 
5
'सुंदर' बैलावरून वाद! गोळीबारात रणजित निंबाळकरांचा मृत्यू; सरकारकडून आर्थिक मदत
6
प्रभासबरोबर डेटिंगच्या चर्चा, दिशा पटानीने शेअर केला टॅटूचा फोटो, म्हणते- "माझ्या टॅटूबद्दल..."
7
मांढरदेवीचा घाटरस्ता, त्यात रस्त्याची कामे, पाऊस आणि त्यात स्कोडा कुशक माँटे कार्लोचा फिल...
8
'कियाराची सिद्धार्थवर काळी जादू..'; नावाखाली चाहत्याला ५० लाखांना गंडवलं, नेमकं प्रकरण काय?
9
Rahul Dravid: राहुल द्रविडला मुख्य प्रशिक्षक बनविण्यासाठी IPL मधील 'या' ४ संघांमध्ये रस्सीखेच
10
Sensex in Modi Gov: मोदींच्या कार्यकाळात २५००० वरून ८०००० वर पोहोचला Sensex; १ लाखापर्यंत जाणार का?
11
'मातोश्री'चे विश्वासू मिलिंद नार्वेकर यांचं शिक्षण आणि संपत्ती किती?; प्रतिज्ञापत्रातून उघड
12
राष्ट्रवादी विधानसभेच्या किती जागा लढवणार? बैठकीत अजित पवारांकडून मोठा दावा
13
वर्ल्ड चॅम्पियन्स बार्बाडोसहून निघाले; वाचा Team India भारतात कुठे आणि केव्हा पोहोचणार?
14
"भाजपने माझं म्हणणं खरं ठरवलं"; गुजरातमधल्या दगडफेकीवरुन राहुल गांधी आक्रमक
15
नवाब मलिक सोबत आहेत की नाही याचा खुलासा फडणवीसांनी करावा; वडेट्टीवारांना वेगळा संशय
16
Hathras Stampede : ज्या मातीसाठी हाथरसमध्ये झाली चेंगराचेंगरी, त्यात काय होतं? समोर आली मोठी माहिती
17
ऋषी सुनक की केयर स्टार्मर, पुढील पंतप्रधान कोण? ब्रिटनमध्ये उद्या निवडणूक 
18
शत्रुघ्न सिन्हा यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, पत्नी आणि मुलांसह 'रामायण' मध्ये परतले
19
Vraj Iron and Steel Share : शेअर बाजारात एन्ट्री घेताच लागलं अपर सर्किट, आयर्न कंपनीच्या शेअरचं जबरदस्त लिस्टिंग
20
'अश्वत्थामा'च्या भूमिकेत असा झाला अमिताभ बच्चन यांचा कायापालट, पाहा हे खास फोटो

मुंडे घराणे ३४ वर्षांनंतर प्रथमच सत्तेपासून दूर

By सोमनाथ खताळ | Published: June 07, 2024 8:22 AM

भाजपसोबत एकनिष्ठ : आमदारकीपाठोपाठ पंकजांना खासदारकीचीही हुलकावणी  

बीड : बीडचे नाव निघाले की, गोपीनाथ मुंडे यांची आठवण येते. १९९० ते २०२४ अशी सलग ३४ वर्षे मुंंडेंच्या घरात खासदार, आमदार आणि मंत्रिपद राहिले आहे; परंतु यावेळी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मुंडे यांची ज्येष्ठ कन्या आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा निसटता पराभव झाल्याने त्यांना सत्तेपासून दूर राहण्याची वेळ आली आहे. आतापर्यंत हे कुटुंब भाजपमध्ये एकनिष्ठ राहिलेले आहे. राज्यातील मंत्री धनंजय मुंडे हे देखील मुंडे घराण्यातीलच आहेत; परंतु ते सध्या अजित पवार गटात आहेत.   

ऊसतोड कामगारांचा नेता म्हणून गोपीनाथ मुंडे यांची ओळख होती. १९७८ मध्ये त्यांनी रेणापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली; परंतु पहिल्याच निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर लगेच दोन वर्षांनी म्हणजेच १९८० मध्ये त्यांनी याच मतदारसंघातून विधानसभा लढवली. यात ते विजयी झाले आणि पहिल्यांदा आमदार झाले; परंतु नंतर १९८५ मध्ये पुन्हा मुंडे यांचा पराभव झाला. त्यानंतर मात्र सलग चार टर्म म्हणजेच २००४ पर्यंत ते सलग आमदार राहिले. 

२००९ मध्ये त्यांनी पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवली. यात ते विजयी झाले. २०१४ मध्येही ते खासदार झाले. केंद्रीय मंत्रिपदही मिळाले; परंतु बीडला येत असतानाच दुर्दैवाने त्यांचे अपघाती निधन झाले. त्यामुळे त्याच वर्षी झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांची दुसऱ्या क्रमांकाची मुलगी डॉ. प्रीतम मुंडे यांनी विक्रमी ९ लाख मतांनी विजय मिळवला. २०१९ मध्येही त्या विजयी झाल्या. २०२४ मध्ये मात्र भाजपने डॉ. मुंडे यांच्याऐवजी त्यांची बहीण माजी मंत्री पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली. परंतु, त्यांचा पराभव झाला.   

कोणाकडे कधी अन् काेणते पद?गोपीनाथ मुंडे - १९८०, १९९०, १९९५, १९९९, २००४ आमदार, २००९ व २०१४ खासदारपंकजा मुंडे - २००९ व २०१४ आमदारडॉ. प्रीतम मुंडे - २०१४ व २०१९ खासदार

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेPritam Mundeप्रीतम मुंडेmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४