- नितीन कांबळे
कडा- चिंचेच्या बागेत एक मोठे अजगर निघल्याने शेतकरी चांगलाच घाबरून गेला. मात्र, प्रसंगावधान राखून शेतकऱ्याने सर्पमित्राला बोलावून घेतले. सर्पमित्राने अजगरास पकडून निसर्गाच्या सान्निध्यात सोडून दिले. ही घटना आज दुपारी घडली.
आष्टी तालुक्यातील फत्तेवडगाव येथे उध्दव अंबादास चौधरी यांची शेती आहे. या शेतातील चिचेच्या बागेत आज दुपारी एक भलेमोठे अजगर आढळून आले.घाबरून शेतकऱ्यांनी कडा येथील सर्पमित्र अक्षय गरूड याला बोलावून घेतले. मोठ्या प्रयत्नानंतर गरूड यांनी सात फुट असलेल्या अजगरला पकडून निसर्गाच्या सान्निध्यात सोडून दिले.यावेळी सुमित जाधव,अभिजीत जाधव,नितीन आळकुटे,राज भोजने आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी सर्पमित्राशी संपर्क करावाशेतात,घरात किवा अन्य अडचणीच्या ठिकाणी साप,अजगर निघाले तर त्याला जीवे न मारता नजीकच्या सर्पमित्रांशी संपर्क साधावा.असे आवाहन सर्पमित्र अक्षय गरूड यांनी केले आहे.