- नितीन कांबळेकडा- जानेवारीत जुन्या वाड्याचे खोदकाम करत असताना तिघाजणांना भिंतीलगत देवळीत घागरभर यादवकालीन सुवर्ण नाणे सापडले होते.पण वाटाघाटीत बिनसल्याने हे प्रकरण थेट पोलीस ठाण्यात गेले.संबधित लोकांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलविण्यात आले.पण अद्याप देखील ते पोलीस ठाण्यात आले नसल्याने या गुप्तधनाचा उलगडा कधी होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आष्टी तालुक्यातील सुर्डी येथे जानेवारीत एका जुन्या वाड्याचे खोदकाम सुरू असताना तिघाजणांना भिंतीच्या देवळीत एक घागरभर यादवकालीन सुवर्ण नाणे सापडले होते.पण याची समातंर वाटणी झाली नसल्याने यातील एकाने फितूर होत पोलीस अधीक्षक यांना फोन करून घटनेची माहिती देत फोटो पाठवले.पोलिसांनी येथील लोकांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलवले होते. पण अद्याप देखील ते तिघेजण पोलीस ठाण्यात चौकशीला न येता तोड दडवत असल्याचे दिसुन येत आहे.जर हे महाशय चौकशीला आले नाही तर गुप्तधनाचा उलगडा होणार कसा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.