अंबाजोगाई : मागील चार दिवसापासून अंबाजोगाईत आयपीएल सट्यासह मटक्याच्या बुकीवर धाड टाकण्याचे सत्र पोलीस अधीक्षकांच्या पथकाने सुरु केले आहे. या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे सोमवारी दुपारी ४.३० वाजता खतीब गल्ली भागातील एका घरावर धाड टाकून मटक्याचे आकडे मोबाईलवर घेत असताना १७ जणांना रंगेहाथ पकडले. यावेळी सदरील मटका एजंटाकडून २,५४,६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून १७ जणांवर शहर ठाण्यात गुन्हा नोंद आहे.आठवडाभरात झालेल्या मटक्याचा हिशोब सोमवारी होत असतो. शहरातील खतीब गल्ली भागात शेख लियाकत आली शेख राजखान यांच्या घरामध्ये १७ जणाकडील मोबाईलवर आठवड्यातील धंद्याचा हिशोब व चिठ्ठ्यांची छाननी होत असल्याची गुप्त माहिती पथक प्रमुख पोउपनि रामकृष्ण सागडे यांना मिळाली होती. त्याप्रमाणे त्यांनी सापळा लावला. सोमवारी दुपारी ४.३० वाजता सदरील घरावर धाड टाकली. या धाडीत २६ मोबाईल, ८ गणकयंत्रे, मटक्याचे साहित्य व चार दुचाकी आणि रोख रक्कम असा एकूण २ लाख ५४ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी या ठिकाणी चिठ्ठ्या छाननी करणारे दत्तात्रय विश्वंभर नेमाणे, शेख शहाबाज शेख युसूफ, राजु शिवाजी भोसले, बापू भारत वाघमारे, शेख मजहर शेख जिलानी, विनोद भीमराव सौदरमल, शेख अखतर शेख नवाब, मोहमद माजिद गौस मोहीउद्दीन, शेख रहीम शेख फरिद, शेख सलीम शेख मोहियोद्दीन, खतीब मकसूद मुताजीब खतीब, अशोक सटवाजी चव्हाण, सयद मक्सूद अली सयद अली हसन, सुभाष रामचंद्र लोमटे, सय्यद रसूल सय्यद अहमद, सयद अझर सयद अबरार आणि मोहंमद मुजाहिद गौस मुयोद्दीन या १७ जणांना ताब्यात घेत त्यांच्यावर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सदानंद भुजबळ करत आहेत.
मटका बुकीवर धाड;१७ जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2019 12:09 AM