शहरातील मोंढा रोडवर मंगलनाथ मल्टिस्टेटची शाखा आहे. शाखाधिकारी उमाकांत काळे हे मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता कामकाज संपल्यानंतर शाखा बंद करून घरी गेले. बॅंकेतील अलार्म सीस्टिममधून रात्री दीड वाजता त्यांना फोनवरून बॅंकेचे शटर व तिजोरीशी छेडछाड केली जात असल्याचे समजले. त्यांनी तातडीने धाव घेतली, तेव्हा त्यांना शटर वाकवून कुलूप तोडलेले दिसले. रोख ३४४ हजार रुपये व हजार रुपये, ३ हजार रुपयांचे इंटरनेट मोडियम चोरट्यांनी लंपास केले. संभाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
....
दगडफेक करून किराणा दुकानदारास मारहाण
बीड: शहरातील बार्शी नाक्यावरील इमामपूर रोडवर किराणा दुकानावर दगडफेक करण्यात आली. दुकानदार नागेश जगदाळे यांनी जाब विचारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना चापटाबुक्क्यांनी मारहाण करून धमकावले. ही घटना ६ रोजी घडली. शुभम कवडे (रा.रामनगर), महेश कवडे, अक्षय वाणी, आदित्य ढोले, अजय ढाेले (सर्व रा.इमामपूर रोड) यांच्यावर पेठ बीड ठाण्यात गुन्हा नोंद झाला. हवालदार दादा उबाळे तपास करत आहेत.
....
गजाने मारहाण, दोघांवर गुन्हा
आष्टी: तालुक्यातील बीड सांगवी येथे एकास गजाने मारहाण करून, डोके फोडल्याची घटना ७ सप्टेंबर रोजी घडली. शेषेराव जाधव असे जखमीचे नाव आहे. त्यांचे बंधू अशोक जाधव यांच्या तक्रारीवरून आष्टी ठाण्यात राजू रावसाहेब डुकरे व विजय रावसाहेब डुकरे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला.
...