लोकमत न्यूज नेटवर्ककेज : तालुक्यातील मस्साजोग येथील विद्युत वितरण कंपनीच्या ३३ केव्ही उपकेंद्रात शनिवारी मध्यरात्री ड्यूटीवर असलेल्या आॅपरेटरचे हात- पाय बांधून दहा ते बारा चोरटयÞांनी उपकेंद्रात ठेवलेल्या ३. १५ मेगावॅट अॅम्पिअरच्या नादुरु स्त ट्रान्सफॉर्मर मधील कॉईलची चोरी केली. या प्रकरणी रविवारी रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.मस्साजोग येथील ३३ के. व्ही. उपकेंद्रात शनिवार रात्री सुरज गवळी हे कर्तव्यावर होते. मध्यरात्री ते रीडिंग घेण्यासाठी गेले असताना उपकेंद्राच्या संरक्षणासाठी उभारण्यात आलेली जाळी तोडून दहा ते बारा अज्ञात चोरट्यांनी उपकेंद्रात प्रवेश केला. त्यानंतर आॅपरेटर सूरज गवळी यांचे हातपाय बांधून रु मालाने तोंड बांधून त्याच्याकडील मोबाईल व नगदी पाच हजार रुपये लुटले. नंतर उपकेंद्रात ठेवण्यात आलेल्या ३.१५ मेगावॅट अॅम्पिअरच्या नादुरुस्त ट्रॉन्सफार्मर मधील तांब्याच्या कॉईलची चोरी करु न पोबारा केला. दरम्यान चोरटे पळून गेल्यानंतर आॅपरेटर सूरजने कशीबशी सुटका करून झालेल्या प्रकाराची वरिष्ठांना माहिती दिली. त्यानंतर वरिष्ठांनी मस्साजोग उपकेंद्रास भेट देऊन पाहणी केली.
मस्साजोग येथील वीज उपकेंद्रात चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 12:49 AM